जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 11:50 PM2019-07-26T23:50:32+5:302019-07-26T23:51:13+5:30

तालुक्यासह जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने सुरू असलेल्या धरणे आंदोलनांतर्गत शुक्रवारी (दि.२६) येथील उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना निवेदन देण्यात आले.

Announce the district drought affected | जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

Next
ठळक मुद्देराष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष : शासनाला पाठविले मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तालुक्यासह जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने सुरू असलेल्या धरणे आंदोलनांतर्गत शुक्रवारी (दि.२६) येथील उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना निवेदन देण्यात आले.
जिल्ह््यात मागील पंधरवड्यापासून पावसाने दडी मारली आहे. अपेक्षित पावसाच्या अर्धाही पाऊस अद्याप पडलेला नाही. यामुळे शेतीची कामे अडली असून पेरणी वाळत आली आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. असे असतानाही शासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने तालुकास्तरावर धरणे आंदोलन करून शासनाला निवेदन पाठवून जागे करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
त्यांतर्गत शुक्रवारी (दि.२६) माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांच्या मार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, तालुकाध्यक्ष कुंदन कटारे, बाळकृष्ण पटले, अशोक गुप्ता, जितेंश टेंभरे, केतन तुरकर, रजनी गौतम, अंचल गिरी, सुनील पटले, जगदीश बहेकार, अखिलेश सेठ, आशिष नागपुरे, प्रकाश देवाधारी, सुनिता दोनोडे, योगराज लिल्हारे, रवि पटले, शैलेंद्र वासनिक, पुनाप्रसाद लिल्हारे, नरेंद्र चिखलोंडे, रमेश गौतम, पुरनलाल उके, करण टेकाम, आरजू मेश्राम, आसीफ सय्यद, छन्नू येळे, धरमलाल रहांगडाले, तेजराम मडामे, हिरामन बावनकर, विकास गेडाम, दुर्याधन मेश्राम, प्रदीप रोकडे, नितीन टेंभरे, सतीश कोल्हे, मदन चिखलोंडे, शोभा गणवीर, विनायक खैरे, रमेश कुरील, नागो बंसोड, लखन बहेलिया, राजेश रहांगडाले, विजय ठाकूर, उमराव भगत, पंकज चौधरी, राजेश चौळे यांच्यासह कार्यकर्ता उपस्थित होते.
एकरी २५ हजार रूपये भरपाई द्या
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात, तालुक्यासह जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रूपये नुकसान भरपाई द्या, सरसकट कर्जमाफी देऊन कृषी वीज बिल माफ करा, २४ तास वीज पुरवठा करा, धानाला तीन हजार रूपये हमी भाव द्या, शेतकऱ्यांना कमी दरात खत उपलब्ध करवून द्या, रब्बी धानाला ७०० रूपये बोनस द्या, तालुक्याचे सर्वेक्षण करून त्वरी नुकसान भरपाई द्या, तालुक्यात रोजगार निर्मिती करून बेरोजगारी दूर करा, एमआरईजीएसचे प्रलंबीत देयक त्वरीत द्या, आरोग्य सेवेत सुधारणा करा, शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करून सर्व सामान्यांना सोय उपलब्ध करून द्या आदि मागण्यांना समावेश आहे.
अन्यथा रस्त्यावरून तीव्र आंदोलन- जैन
जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत असताना शासनाचे अद्याप दुर्लक्ष आहे. अशात शेतकºयांना मदतीचा हात पुढे करून शेतकºयांच्या हितार्थ आवश्यक उपाययोजना तातडीने सुरू करण्यात याव्या. अन्यथा रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन करणार, असा इशारा निवेदन देताना माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दिला.

Web Title: Announce the district drought affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.