घरकूल योजनेतील प्रपत्र 'ड'ची यादी जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:21 AM2021-06-18T04:21:07+5:302021-06-18T04:21:07+5:30
शासनाच्यावतीने नागरिकांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. यात एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे घरकुल योजना आहे. या योजनेंतर्गत वडेगाव, मुंडीकोटा, ...
शासनाच्यावतीने नागरिकांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. यात एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे घरकुल योजना आहे. या योजनेंतर्गत वडेगाव, मुंडीकोटा, सुकडी-डाकराम, आलेझरी, इंदोरा बु. परिसरात प्रपत्र 'ब' ची यादी मंजूर करण्यात आली असून घरकुलांचे कामही सुरू आहे. मात्र, प्रपत्र 'ड'ची यादी जाहीर करण्यात आली नसल्यामुळे अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०२२ पर्यंत सर्वांना पक्के घर देण्यात येणार आहे. मात्र, प्रपत्र 'ड' ची यादी जाहीर करण्यात आली नसल्यामुळे लाभार्थ्यांचे घरकुल योजनेचे स्वप्न पूर्ण होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रपत्र 'ड' ची यादी त्वरित जाहीर करून लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी ओमकार पटले यांनी केली आहे.