तालुका दुष्काळ घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 11:20 PM2017-09-22T23:20:13+5:302017-09-22T23:20:27+5:30

पावसाअभावी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत तालुक्यासह पूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करुन येथील शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी.

Announce taluka drought | तालुका दुष्काळ घोषित करा

तालुका दुष्काळ घोषित करा

Next
ठळक मुद्देतालुका काँग्रेस कमिटीची मागणी : तहसीलदारांना दिले मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : पावसाअभावी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत तालुक्यासह पूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करुन येथील शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी. या मागणीसाठी तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने तहसीलदार विजय बोरुडे यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात, देवरी तालुक्यासह संपूर्ण गोंदिया जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करुन येथील सर्व शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतकºयांच्या कर्जवसुलीवर बंदी घालावी, शेतकºयांचे कोणतेही कर वसुली करु नये, शासनाने प्रत्येक शेतकºयाला प्रति हेक्टर ३५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, उपसा सिंचन योजनेतील वीज कनेक्शन आणि शेतकºयांचे कृषी पंपाचे वीज कनेक्शन त्वरित सुरू करा व देशात सतत वाढणारे पेट्रोल, डिझल आणि घरगुती गॅसच्याकिमती कमी करा यासह विविध मागण्यांचा समावेश होता.
निवेदन तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम (बाबा) कटरे व महासचिव सहषराम कोरोटे यांच्या नेतृत्वात तहसीलदार बोरूडे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
याप्रंसगी जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष तथा जि.प.सदस्य उषा शहारे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संदीप भाटीया, जि.प.सदस्य माधुरी कुंभरे, नगर पंचायतचे उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, माजी सभापती वसंत पुराम, माजी पं.स. सदस्य सोनू नेताम, माजी सरपंच जैपाल शहारे, काँग्रेस कार्यकर्ता गणेश भेलावे, प्रकाश नहाके, प्रतापसिंग बैना, हंसराज पटले, मनोहर शहारे, पुरनदास राऊत, भाऊदास बोबर्डे, लोकचंद परिहार, अविनाश टेंभरे, शकील कुरेशी, संदीप मोहबीया, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष नरेश राऊत, कैलास साखरे, खुशाल किरसान, रामेश्वर फाफनवाडे, केवलराम मडावी, ईश्वर मडावी, नेतराम पाचे, सदाशिव कलचार, संजय भोयर, लक्ष्मण ताराम, शिवकुमार राऊत, रामकुमार भेंडारकर, विरेंद्र बैना, भाष्कर येरणे, रामचंद टेंभुर्रकर, ऋषीकेश बैस, भोजराज मडावी, दिगंबर चौधरी, कैलाश घासले यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Announce taluka drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.