वार्षिक उत्सव विद्यार्थी जीवनाचे अभिन्न अंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 01:22 AM2019-01-10T01:22:44+5:302019-01-10T01:23:20+5:30
शाळा व विद्यालयात आयोजित वार्षिक उत्सव हे विद्यार्थी जीवनाचे अभिन्न अंग आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो. आई-वडील व शिक्षकांकडून संस्कार योग्य संस्कार मिळतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शाळा व विद्यालयात आयोजित वार्षिक उत्सव हे विद्यार्थी जीवनाचे अभिन्न अंग आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो. आई-वडील व शिक्षकांकडून संस्कार योग्य संस्कार मिळतात. तर योग्यता आणि गुणवत्ता हा सर्व विद्यार्थ्यांचा समान अधिकार असल्याचे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.
तालुक्यातील मोहाडी येथील स्व.सुलोचनादेवी पारधी विद्यालय व श्री सुदामा कनिष्ठ विद्यालयाचे वार्षिक स्रेहसंमेलन सोमवारी (दि.७) आयोजित करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.मधुकर कुकडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ.सेवक वाघाये, माजी उपाध्यक्ष रमेश पारधी, सभापती कलाम शेख, अमरनाथ रगडे, बाळा ठाकूर, सरपंच कविता दमाहे, सत्यफुला लेंडे, उषा बोंदरे, पोर्णिमा बुराडे, त्रिशुला दमाहे, सीमा रहांगडाले, ईश्वर गिºहेपुंजे, मुर्लीधर गायधने, नरेश ईश्वरकर, रामकृष्ण पुंडे, डी.एल.पात्रे, आशा भुटकुरे, आनंद सिंगनजुडे, गणेश निमजे, रागिनी सेलोकर, अरुण श्रीेपाद, सुनिता सोरते, शरद तितीरमारे, प्रमोद तितीरमारे, मिलिंद लांजेवार, पुरूषोत्तम झलके, कार्यवाह अविनाश चौधरी, खुशाल शेंडे, आयुष माहुले, समीक्षा गोखले उपस्थित होते.
अग्रवाल म्हणाले, योग्यता आणि गुणवत्ता ही कठोर परिश्रम व प्रामाणिकतेने प्राप्त होत असते. शारीरिक व बौध्दीक विकासाप्रती प्रत्येक विद्यार्थ्याने सजग राहून योग्य बनण्याचा प्रयत्न केल्यास यश नक्कीच प्राप्त होत असल्याचे सांगितले. तितीरमारे म्हणाले आ.अग्रवाल यांच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. संस्थेच्या मंत्रालयीन स्तरावरील कामांना अग्रवाल यांचे नेहमीच सहकार्य मिळत असल्याचे सांगितले. उपस्थित अन्य मान्यवरांनी सुद्धा या वेळी मार्गदर्शन केले. या दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी त्यांच्या कला गुणांचे सादरीकरण केले.