तालुक्यात आणखी १० आरोग्य उपकेंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 01:01 AM2018-10-17T01:01:41+5:302018-10-17T01:02:04+5:30
तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येकच नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहचावी या दृष्टीन ेजिल्ह्यातील केवळ गोंदिया तालुक्याला शासनाच्या हेल्थ वेलनेस स्कीममध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येकच नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहचावी या दृष्टीन ेजिल्ह्यातील केवळ गोंदिया तालुक्याला शासनाच्या हेल्थ वेलनेस स्कीममध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
भविष्यात तालुक्यातील सर्व ५६ आरोग्य उपकेंद्रांत आयुर्वेदिक डॉक्टरांची नियुक्ती होणार व ते दररोज २० घरांत जावून रूग्णांचा उपचार करणार. अपघातग्रस्त रूग्णांना त्वरत उपचार मिळावा यासाठी १०८ रूग्णवाहिका सेवा रजेगाव येथील ग्राममीण रूग्णालयात सुरू केली आहे. त्यात तालुक्यात आणखी १० नवे आरोग्य उपकेंद्र सुरू होणार असल्याचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी सांगीतले.
तालुक्यातील ग्राम आसोली येथे आयोजीत आरोग्य निदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद आरोग्य समिती सभापती रमेश अंबुले होते. अंबुले यांनी, जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रत्येक रूग्णांना उपचार देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. शिवाय सर्वच आरोग्य केंद्र व उपकेंद्रांत अत्याधुनिक मशिन्स लावण्याच्या योजनेवर जिल्हा परिषद आमदार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात गंभीरतेने कार्य करीत असल्याचे सांगीतले.
शिबिरात वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. रूखमोडे, डॉ. सतीश जायस्वाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निमगडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. खंडाते, जिल्हा परिषद सभापती लता दोनोडे, माधुरी हरिणखेडे, चमन बिसेन, विजय लोणारे, हरिचंद कावळे, बंटी भेलावे, मिथुन पटेल, दुलीचंद धुर्वे, जोशीराम भेलावे, सुरेंद्र मेश्राम, तुळशीदास मेश्राम, विजय कटरे, संतोष पटले, राहुल कापसे, अभिमन्यु पाटील, ओमप्रकाश पटले, विजय हरिणखेडे, कैलाश सुरसाऊत, हिवरलाल शरणागत, प्रदीपसिंह परिहार, लखू ठाकुर, रविंद्र ठाकुर, होलराज बिसेन, भुमेश्वर टेंभरे, किशोर मेहूरकर, महेंद्र बिंझाले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
३९० रूग्णांची आरोग्य तपासणी
शिबिरात ग्राम आसोलीसग परिसरातील ३९० हून अधिक रूग्णांची ईसीजी, रक्तदाब, मधुमेह, नेत्र-दंत-चर्मरोग, गरोदर माता व कुपोषीत बाळांची तपासणी करून औषध देण्यात आले. यातील ११ रूग्णांची शस्त्रक्रीयेसाठी निवड करून त्यांना केटीएस रूग्णालयात पाठविण्यात आले.