आणखी ११६ किलो चंदन जप्त
By admin | Published: September 22, 2016 12:37 AM2016-09-22T00:37:32+5:302016-09-22T00:37:32+5:30
चंदन तस्करी करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना पकडण्यात आले. तिघे आरोपी फरार झाले होते.
वनविभागाची कारवाई : तीन आरोपी फरारच
गोंदिया : चंदन तस्करी करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना पकडण्यात आले. तिघे आरोपी फरार झाले होते. या प्रकरणात तपास करताना वनाधिकाऱ्यांनी दोन ठिकाणातून ११६ किलो चंदन जप्त करण्यात आले.
अटक करण्यात आलेला आरोपी रामगोपाल बनकर रा. बगडमारा याच्याघरून ८४ किलो ओले चंदन लाकडे तर ३० किलो लहान जळाऊ चंदन लाकडे जप्त करण्यात आले.
या प्रकरणात फरार असलेला आरोपी अमित रोडे रा. इंदोरा ता. रामटेक जि. नागपूर याच्या घरी चंदन वाहून नेणाऱ्या तीन बॅग आढळल्या त्या बॅगमध्ये २ किलो चंदन आढळले आहे.
यापूर्वी वनाधिकाऱ्यांनी उत्तरप्रदेशातील कन्नोज जिल्ह्यातील हाजीगंज येथील मो. फैयाज मो. सरदार अंसारी व राम गोपाल बनकर रा. बगडमारा ता. किरणापूर जि. बालाघाट व बनकर या दोघांना अटक केली होती. मध्यप्रदेशातून गोंदिया मार्गे नागपूरला चंदनाची तस्करी होत असल्याची माहिती क्षेत्र सहाय्यक अरूण साबळे यांना मिळाली होती. यावरून मोटारसायकल एम.पी. ५० एमजी ३०१५ व एमएच ४० व्ही ९२२१ या दोन वाहनांवर ६१ किलो चंदन वाहून नेत असताना अटक करण्यात आली होती. सदर कारवाई सहाय्यक उपवनसंरक्षक नरेंद्र शेंडे, वनपरीक्षेत्राधिकारी आनंद मेश्राम यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक अरूण साबळे, वनरक्षक पी. व्ही. शिंगणे, वाहन चालक सागर लोहीत, वनमजूर फत्तू बागडे, भोयर यांनी केली. परंतु चंदनाची तस्करी करणारे या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात वनविभागाला यश आले नाही. आरोपींच्या मागावर वनाधिकारी आहेत. (तालुका प्रतिनिधी)