अमली पदार्थ विरोधी दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 10:18 PM2019-06-29T22:18:29+5:302019-06-29T22:18:42+5:30

पोलीस विभाग व मनोहरभाई पटेल हायस्कूल यांच्या संयुक्तवतीने बुधवारी (दि.२६) शहरात रॅली काढून आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ दिवस साजरा करण्यात आला.

Anti-anti-day celebrations | अमली पदार्थ विरोधी दिवस साजरा

अमली पदार्थ विरोधी दिवस साजरा

Next
ठळक मुद्देरॅली। पोलीस विभाग व मनोहरभाई पटेल हायस्कूलचा संयुक्त उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : पोलीस विभाग व मनोहरभाई पटेल हायस्कूल यांच्या संयुक्तवतीने बुधवारी (दि.२६) शहरात रॅली काढून आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ दिवस साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम मनोहरभाई पटेल हायस्कूलमध्ये राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ठाणेदार कमलेश बच्छाव यांनी, विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना आपले जीवन सुंदर असून ते एकदाच मिळते. त्यामुळे अमली पदार्थांपासून दूर राहून आपले जीवन अधीक सुंदर बनवावे असे सांगीतले.
दरम्यान काढण्यात आलेल्या रॅलीत अपर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, ठाणेदार कमलेश बच्छाव, नागेश भास्कर, प्राचार्य के.सी.शहारे, शालेय विद्यार्थी व पोलीस जवानांनी सहभाग घेतला.
रॅली शहरातील प्रमुख मार्गावरुन भ्रमण करीत रॅली पोलीस ठाण्यात पोहोचली. तेथे विद्यार्थ्यांना पोलीस विभागाचे कार्य समजावून सांगण्यात आले. कार्यक्रमासाठी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
याप्रसंगी गायत्री परिवारचे प्रतिनिधी रतीराम दरवडे यांनी व्यसनमुक्त स्वर्णीम भारत महाअभियानाची पुस्तके नागरिकांना वाटून व्यसन मुक्त आंदोलनासंबधात नागरिकांना माहिती दिली.

Web Title: Anti-anti-day celebrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.