जादूटोणाविरोधी कायद्याने व्यक्ती विज्ञानवादी बनतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:01 AM2017-11-22T00:01:40+5:302017-11-22T00:01:51+5:30

स्त्री ही अनंत काळाची माता आहे. तिचा सन्मान झाला पाहिजे तरच स्त्रीचे शोषण थांबेल. धर्माचा वापर करु न स्त्रियांचे मोठ्या प्रमाणात शोषण करणारी यंत्रणा वर्षानुवर्षे सुरु आहे.

Anti-voodoo law makes person become a vigilant | जादूटोणाविरोधी कायद्याने व्यक्ती विज्ञानवादी बनतो

जादूटोणाविरोधी कायद्याने व्यक्ती विज्ञानवादी बनतो

Next
ठळक मुद्देश्याम मानव : श्रद्धा ही डोळस असावी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : स्त्री ही अनंत काळाची माता आहे. तिचा सन्मान झाला पाहिजे तरच स्त्रीचे शोषण थांबेल. धर्माचा वापर करु न स्त्रियांचे मोठ्या प्रमाणात शोषण करणारी यंत्रणा वर्षानुवर्षे सुरु आहे. जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली तर प्रत्येक व्यक्ती हा विज्ञानवादी होईल, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक संघटक तथा राज्य जादूटोणाविरोधी कायद्याची अंमलबजावणी करणाºया समितीचे सहअध्यक्ष प्रा.श्याम मानव यांनी केले.
येथील संथागार येथे रविवारी (दि.१९) ‘वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया’ आणि जादूटोणाविरोधी कायदा या विषयावर जाहीर व्याख्यान देताना ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे जिल्हा संघटक प्रा.डॉ.प्रकाश धोटे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसुदन धारगावे, निशा भूरे, संजय झुरमूरे प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रा. मानव म्हणाले, आमचा देवाधर्माला विरोध नाही. देवाधर्माच्या नावाखाली सामान्य माणसाच्या फसवणुकीला आमचा विरोध आहे. संत परंपरा आणि बुवाबाजी ही वेगळी आहे. ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्याच्याबद्दल शंका ठेवू नये. श्रद्धेचे रुपांतर केव्हा अंधश्रद्धेमध्ये होते हे कळत नाही. त्यामुळे श्रद्धा ही डोळस असली पाहिजे, ती आंधळी नसावी. तिची चिकित्सा करता आली पाहिजे, यासाठी जादूटोणा विरोधी कायदा असल्याचे सांगितले.
‘वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया’ या विषयावर प्रकाश टाकताना प्रा.मानव यांनी, डेरा सच्चा सौदाचा नायक बाबा रामरहीम हा एका रात्रीतून खलनायक कसा झाला. प्रसारमाध्यमांनी गुरमीत रामरहिमच्या अनेक गोष्टी जगापुढे आणून खळबळ माजविली. अनेक बुवा-बाबा आज गजाआड असल्याचे त्यांनी सांगितले. काही धर्मातील पुरोहित, मौलवी, बाबा, पादरी हे धार्मिक तरतुदींचा वापर आपल्या फायद्यासाठी करुन घेऊन त्यातून स्त्री शोषणाचा मार्ग शोधून काढत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी जादूटोणाविरोधी कायद्याच्या सर्व १२ कलमांची माहिती दिली.
पालकमंत्री बडोले यांनी, समाजातील अनिष्ट परंपरा, वाईट चालीरिती, अंधश्रद्धा, शोषण व बुवाबाजीच्या नावावर होणारी लुटमार थांबविण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा शासनाने केला आहे. या कायद्याची जनजागृती करण्याचे काम सामाजिक न्याय विभाग करीत आहे. अंधश्रद्धेचे निर्मुलन करुन सशक्त समाज निर्माण करण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा अत्यंत उपुयक्त असल्याचे मत व्यक्त केले.
पोलीस अधीक्षक डॉ.भूजबळ यांनी, सुशिक्षीत आणि सुसंस्कृत समाज अंधश्रध्देला बळी पडणे म्हणजे समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब धोकादायक आहे. जिल्ह्यात जादूटोणा विरोधी कायद्याची माहिती पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाºयांना व्हावी यासाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळेमुळे कायद्याच्या तरतुदीची माहिती कशाप्रकारे गुन्हे दाखल करावे, याची माहिती मिळण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रा.डॉ.प्रकाश धोटे यांनी केले.
संचालन व आभार अमर वºहाडे यांनी मानले. कार्यक्र माला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Web Title: Anti-voodoo law makes person become a vigilant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.