महागाईच्या विरोधात निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 12:19 AM2017-10-12T00:19:32+5:302017-10-12T00:20:30+5:30
गोंदिया जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष उषा शहारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला काँग्रेसची सभा शनिवार (दि.७) गोंदिया येथील भोला भवनात घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : गोंदिया जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष उषा शहारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला काँग्रेसची सभा शनिवार (दि.७) गोंदिया येथील भोला भवनात घेण्यात आली. या सभेनंतर सतत वाढणाºया गॅस, पेट्रोल व डिझेल यांच्यासह जिवनावश्क वस्तूचे दर नियंत्रणात आणणाºया संघषात गोंदियाचे उपजिल्हाधिकारी महिरे यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना जिल्हा महिला काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सादर केले. महागाई नियंत्रणात आणले नाहीत. या मागणीला धरुन पक्ष तिव्र आंदोलन करेल, अशा इशाराही देण्यात आला.
जिल्हा महिला काँग्रेसची ही सभा जिल्हा महिला काँग्रेसची नियंत्रक बेबी गौरीकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. याप्रसंगी जि.प. अध्यक्षा उषा मेंढे, उषा शहारे, जि.प.सदस्य, पं.स. सभापती, उपसभापती, पं.स.सदस्य, सरपंच व पक्षाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. सभेत पक्षाचे महिला संघटन, ग्रा.पं.ची निवडणूक, वाढत्या महागाई व पक्षाचा आढाव्यावर चर्चा करण्यात आली. या सभेत बेबी गौरीकर, उषा मेंढे, रोहीणी रहांगडाले, सरिता अंबुले, जि.प. सदस्य लता दोनोडे, वंदना काळे, पं.स. उपसभापती संगीता भेलावे, सभापती हेमलता डोये, माधुरी हरिणखेडे, नगरसेविका प्रज्ञा गणवीर यांनी महिलांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष उषा शहारे, संचालन देवरी तालुका महिला अध्यक्ष सुषमा घरत व आभार जि.प. सदस्य सीमा मडावी यांनी मानले. निवेदन सादर करणाºया शिष्टमंडळात जिल्हा महिला अध्यक्ष उषा शहारे, जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, गोंदिया पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे, आमगावच्या सभापती हेमलता डोये, देवरीचे उपसभापती संगीता भेलावे, सीमा मडावी, लता दोनोडे, ज्योती वालदे, माधुरी कुंभरे, सरिता कापगते, योजना कोतवाल, छाया मेश्राम, रोहीणी रहांगडाले, सरपंच आशा खांडवाये, मीरा नाईक, नगरसेविका वंदना शहारे, वंदना जांभुळकर, उर्मिला जुमनाके, प्रज्ञा गणविर, सुषमा घरत, इंद्रानी धावडे यांचा समावेश होता.
या समस्यांवर होता रोष
जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने राज्यात सतत वाढणारे घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेलच्या किंमती आणि जिवनावश्यक वस्तूंच्या किंमतीमुळे सर्वसामान्य गरीब गृहणी यांना आर्थिक त्रास होत आहे. त्याकरिता वाढत्या महागाई व गॅस, पेट्रोल, डिझेलचे दर नियंत्रणात ठेवण्यात यावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नावे गोंदियाचे उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांना निवेदन ददेण्यात आले.