देवरी बंद व मोर्चाचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 09:15 PM2019-06-02T21:15:34+5:302019-06-02T21:15:58+5:30

पाच वर्षीय चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेचा निषेध म्हणून सोमवारी (दि.३) तालुकावासीयांच्यावतीने देवरी बंदचे आवाहन केले असून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. सदर मोर्चा व बंद सर्व धर्मीय-सर्वजातीय नागरिकांच्यावतीने स्वयंस्फुर्तीने आयोजित करण्यात आले असून याविषयी संत रविदास मंदिरात सभेचे आयोजन करण्यात आले होते.

Appeal appealed for Deori closure and morcha | देवरी बंद व मोर्चाचे आवाहन

देवरी बंद व मोर्चाचे आवाहन

Next
ठळक मुद्देचिमुकलीवरील अत्याचार प्रकरण : नेते यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : पाच वर्षीय चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेचा निषेध म्हणून सोमवारी (दि.३) तालुकावासीयांच्यावतीने देवरी बंदचे आवाहन केले असून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
सदर मोर्चा व बंद सर्व धर्मीय-सर्वजातीय नागरिकांच्यावतीने स्वयंस्फुर्तीने आयोजित करण्यात आले असून याविषयी संत रविदास मंदिरात सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत ठरल्याप्रमाणे मोर्चाची सुरुवात सोमवारी (दि.३) सकाळी ८ वाजता येथील पंचशील चौकातून होणार आहे.
यादरम्यान शहरातील बाजारपेठ पूर्णत: बंद ठेवण्याचे आवाहन देवरी वासीयांच्यावतीने करण्यात आले आहे. मोर्चामध्ये तालुक्यातील जनतेने स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हावे असे कळविण्यात आले आहे.
दरम्यान, रविवारी (दि.२) पिडीत चिमुकलीच्या घरी खासदार अशोक नेते यांनी आमदार संजय पुराम यांच्यासह भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी पिडीत चिमुकलीच्या आरोग्याबाबत आस्थेने विचारपूस करुन सर्वतोपरी मदत करण्याचे आणि त्या नराधमास कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी सदर प्रकरण जलगदती न्यायालयात चालविण्याची शिफारस करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी प्रमोद संगीडवार, संजय उईके, सोनू चोपकर व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान संत रविदास मंदिरात एकत्रीत आलेल्या चर्मकार समाजाच्यावतीने कठोर कार्यवाही संबंधात त्यांना निवेदन देण्यात आले.

मेश्रामला गुरुवारपर्यंत पीसीआर
गोंदिया : पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अश्वीन मेश्राम (२९,रा.सुरभी चौक) याला पोलिसांनी रविवारी न्यायालयात हजर केले. यावर न्यायालयाने त्याला गुरूवारपर्यंत (दि.६) पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Appeal appealed for Deori closure and morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.