कर्जाचा विनियोग स्वावलंबनासाठी करा

By Admin | Published: July 12, 2017 02:27 AM2017-07-12T02:27:50+5:302017-07-12T02:27:50+5:30

सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या माध्यमातून अनुसूचित जातीतील

Apply for debt independence | कर्जाचा विनियोग स्वावलंबनासाठी करा

कर्जाचा विनियोग स्वावलंबनासाठी करा

googlenewsNext

राजकुमार बडोले : महात्मा फुले महामंडळाचा वर्धापन दिन
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या माध्यमातून अनुसूचित जातीतील बेरोजगार तरूण-तरूणी, तसेच गरजू व्यक्तीचे स्वावलंबी व्हावे यासाठी त्यांना उद्योग-व्यवसाय उभारणीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. बेरोजगार व गरजूंना महामंडळांतर्गत देण्यात येणाऱ्या कर्जाचा विनियोग खऱ्या अर्थाने स्वावलंबनासाठी करावा, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या वर्धापन दिनानिमीत्त सोमवारी (दि.१०) बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाचे उपायुक्त देवसूदन धारगावे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, जात पडताळणी कार्यायालचे संशोधन अधिकारी गौतम वाळके कार्यक्रमाला उपस्थित होते.
पुढे नामदार राजकुमार बडोले म्हणाले, ५०० कोटींचे या महामंडळाचे भागभांडवल आहे. या महामंडळामुळे अनेकांनी उद्योग व्यवसायात यश संपादन केले आहे. कोणत्याही महामंडळाकडून घेतलेले कर्ज हे बुडविण्यासाठी असतात
हा विचार सर्वप्रथम डोक्यातून काढावा. आज या महामंडळाचे भागभांडवल संपत असून नव्याने ७०० कोटी रूपये भागभांडवल मागण्यात येईल. समाज कल्याण विभागाच्या अधिनस्त असलेल्या विविध महामंडळापैकी जास्त निधी या महामंडळाला देण्यात आला आहे. जिल्ह्यात या महामंडळाची कर्ज वसूली केवळ १२ टक्के आहे. ज्यांना महामंडळामार्फत कर्ज देण्यात आले आहे त्यांनी कर्जाची वेळीच परतफेड करावी, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
भविष्यात अनुसूचित जातीतून उद्योजक घडविण्यासाठी या महामंडळाकडून कर्ज देण्यात येईल असे सांगून त्यांनी, यापुढे कर्ज देतांना योग्य त्या व्यवसायासाठी कर्ज देण्यात येईल.
ज्यांच्याकडे या महामंडळाच्या कर्जाची थकबाकी आहे त्यांच्याकडून कर्जाची वसूली करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. अनुसूचित जातीच्या व्यक्तींना स्वावलंबी करण्यास हे महामंडळ निश्चित काम करेल असे ते म्हणाले.
प्रास्ताविक महात्मा फुले महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक व्ही.आर.ठाकूर, संचालन मुळे तर आभार इंगळे यांनी मानले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक व लाभार्थी मोठ्या संख्यत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Apply for debt independence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.