सातवा वेतन आयोग विनाअट लागू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 10:12 PM2018-12-31T22:12:32+5:302018-12-31T22:12:55+5:30
नगर परिषद कर्मचाऱ्यांनाही विना अट सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा यासह १५ मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी व कामगार संघटना संघर्ष समितीच्यावतीने १ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नगर परिषद कर्मचाऱ्यांनाही विना अट सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा यासह १५ मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी व कामगार संघटना संघर्ष समितीच्यावतीने १ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्यातील नगर परिषद, नगरपंचायतींमधील सर्व कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, रोजंदारी कर्मचारी, अनुकंपाधारक, पाणी पुरवठा विभाग कर्मचारी, अग्निशमन विभाग, सफाई कामगार, कंत्राटी कामगार व मानधनावरील कर्मचाºयांच्या प्रलंबीत मागण्यांवर शासन स्तरावरून ठोस कार्यवाही होत नाही. त्यात आता शासनाने सातवा वेतन आयोग लागू केला आहे. मात्र यातून नगर परिषद कर्मचाºयांना डावलण्यात आले आहे. नगर परिषद कर्मचाºयांना घेऊन शासनाचा हा दुर्लक्षीतपणा लक्षात घेत नगर परिषद कर्मचाºयांमध्ये रोष व्याप्त आहे. अशात सातवा वेतन आयोग विना अट लागू करून अन्य मागण्यांचीही पूर्तता करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, कामगार संघटना संघर्ष समितीने केली आहे. आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी समितीने १ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. यासाठी समितीच्यावतीने नगराध्यक्ष व जिल्हाधिकाºयांसह संबंधीतांना निवेदन दिले आहे. समितीच्या न्याय्य मागण्यांना नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी, नगर परिषद कर्मचाºयांच्या मागण्यांची पूर्तता करून त्यांना न्याय देण्यात यावा. या आयशाचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, सामाजीक न्याय मंत्री राजकुमार बडोले, लोक लेखा समिती अध्यक्ष गोपालदास अग्रवाल यांच्यासह संबंधितांना दिले आहे.
काळ्या फिती लावून निषेध
आपल्या मागण्यांना घेऊन संघर्ष समितीने १ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. मात्र आंदोलनांतर्गत १५ डिसेंबरला राज्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायत कार्यालयांसमोर निर्देशन व धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर २९, ३० व ३१ तारखेला कर्मचाºयांनी काळ््या फिती लावून काम केले. येथील नगर परिषदेतील कर्मचाºयांनी सोमवारी (दि.३१) गेट मिटींग घेऊन आंदोलनाबाबत चर्चा केली. तसेच काळ््या फिती लावून काम केले.