खेळांप्रति प्रेरित करण्याचा प्रशंसनीय प्रयत्न ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:26 AM2021-03-22T04:26:15+5:302021-03-22T04:26:15+5:30
गोंदिया : आज इंटरनेट व व्हॉट्सॲपमुळे युवावर्ग मैदान सोडून मोबाईलकडे वळत आहे. मात्र काही क्रीडाप्रेमींच्या माध्यमातून आजही क्रीडा स्पर्धांचे ...
गोंदिया : आज इंटरनेट व व्हॉट्सॲपमुळे युवावर्ग मैदान सोडून मोबाईलकडे वळत आहे. मात्र काही क्रीडाप्रेमींच्या माध्यमातून आजही क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जात असून त्यांनी मैदानी खेळांना जिवंत ठेवले आहे. आजच्या पिढीला खेळांकडे प्रेरित करून त्यांना मैदानात आणण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन एक प्रशंसनीय प्रयत्न आहे, असे प्रतिपादन माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
येथील न्यू फ्रेंड्स कृष्णा उत्सव ग्रुपच्यावतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी अग्रवाल यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या संघांना व खेळाडूंना पुरस्कार वितरित करण्यात आले. तर ग्रुपच्यावतीने अग्रवाल यांना स्मृतिचिन्ह भेट देण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक राकेश ठाकूर, नगरसेवक क्रांती जायस्वाल, मंटू पुरोहित, शकील मंसुरी, संदीप ठाकूर, संदीप रहांगडाले, पारस पुरोहित, सुमित महावत, दीपल मालगुजार, सचिन अवस्थी, रौनक अग्रवाल, सुजल ठाकूर यांच्यासह अन्य उपस्थित होते.