४९.५८ लाखांंच्या कामांना मंजुरी
By admin | Published: May 28, 2016 01:52 AM2016-05-28T01:52:46+5:302016-05-28T01:52:46+5:30
जिल्ह्याच्या विकासकामांना गती मिळावी या अनुषंगाने ना. राजकुमार बडोले यांनी खनिकर्म विभागाशी पाठपुरावा केला.
विकास कामे : बडोले व अग्रवाल यांच्या प्रयत्नांना यश
गोंदिया : जिल्ह्याच्या विकासकामांना गती मिळावी या अनुषंगाने ना. राजकुमार बडोले यांनी खनिकर्म विभागाशी पाठपुरावा केला. दरम्यान उद्योग, ऊर्जा व कामगार मंत्रालयाने महाराष्ट्र खनिज विकास निधीअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील पाच रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली आहे. या कामांसाठी ४९.५८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून जिल्ह्यातील विकासकामांना गती मिळणार असल्याची माहिती भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी दिली आहे.
जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रस्त्यांचा सिंहाचा वाटा राहणार आहे. ही बाब लक्षात घेवून पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी जिल्ह्यातील रस्ता बांधकामांना पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले आहे. या अनुषंगाने विविध विभागातून रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली. यानुरूप खनिकर्म विभागाशी पाठपुरावा केला. दरम्यान खनिकर्म मंत्री प्रकाश मेहता यांची ना. बडोले व विनोद अग्रवाल यांनी भेट घेतली. खनिकर्म विभागाने जिल्ह्यातील प्रस्तावित २० किमीच्या पाच रस्त्यांना मंजुरी दिली आहे. एकंदरित ४९.५८ लाखांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.
सर्व मंजूर रस्ते गोंदिया तालुक्यातील असून जिरूटोला ते नदीघाट रस्ता खडीकरण ९.९९ लाख, सतोना, हिवरा ते ढाकणी रस्ता खडीकरण ९.९९ लाख, धामनगाव ते नाला घाट रस्ता खडीकरण १० लाख, हिवरा ते ढाकणी रस्ता खडीकरण १० लाख व कामठा येथे सिमेंट रस्ता १० लाख या कामांचा समावेश आहे.