अर्जुनी नगर पंचायतीत नऊ महिला सदस्य
By admin | Published: August 22, 2015 12:17 AM2015-08-22T00:17:05+5:302015-08-22T00:17:05+5:30
आगामी नगर पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने गुरुवारी (२०) तहसील कार्यालयात प्रभागनिहाय आरक्षण काढण्यात आले.
अर्जुनी मोरगाव : आगामी नगर पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने गुरुवारी (२०) तहसील कार्यालयात प्रभागनिहाय आरक्षण काढण्यात आले. नगरीत एकूण १७ प्रभाग तयार करण्यात आले. यात अनुसूचित जाती प्रवर्ग ५, अनु. जमाती २, नामाप्र ५ व सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. एकूण १७ जागांपैकी ९ महिलांसाठी आरक्षित आहेत.
९ हजार ४६९ लोकसंख्या असलेल्या या नगर पंचायत निवडणुकीची सोडत उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. प्रभाग १ व २ अनु.जाती महिला, प्रभाग ३ सर्वसाधारण, प्रभाग ४ अनु.जमाती महिला, प्रभाग ५ नामाप्र महिला, प्रभाग ६ सर्वसाधारण महिला, प्रभाग ७ सर्वसाधारण, प्रभाग ८ अनु.जाती महिला, प्रभाग ९ सर्वसाधारण महिला, प्रभाग १० नामाप्र, प्रभाग ११ नामाप्र महिला, प्रभाग १२ सर्वसाधारण, प्रभाग १३ नामाप्र, प्रभाग १४ अनु.जमाती, प्रभाग १५ अनु.जाती, प्रभाग १६ नामाप्र महिला व प्रभाग १७ अनु. जातीसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. (तालुका प्रतिनिधी)
दिग्गजांना फटका
प्रभाग आरक्षणात अनेकांचे समीकरण बिघडले. संपूर्ण ग्रामवासियांचे लक्ष याकडे लागले होते. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. ५० टक्के महिला आरक्षणामुळे दिग्गजांना नजीकच्या दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढावी लागणार आहे. अनेकांना निवडणुकीपासून वंचित राहण्याचा प्रसंग ओढवला आहे. आरक्षण सोडतीचे वेळी अनेक दिग्गजांच्या चेहऱ्यावर निराशा दिसून येत होती.