आरोग्य भारतीची तालुका शाखा गठीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:30 AM2021-01-19T04:30:39+5:302021-01-19T04:30:39+5:30
तिरोडा : आरोग्य भारतीकडून दया हाॅस्पिटलमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत तालुका शाखेचे गठन करण्यात आले. निसर्गोपचार, योग, प्राणायाम, घरगुती औषधे, ...
तिरोडा : आरोग्य भारतीकडून दया हाॅस्पिटलमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत तालुका शाखेचे गठन करण्यात आले.
निसर्गोपचार, योग, प्राणायाम, घरगुती औषधे, मानसिक तणाव व्यवस्थापनाच्या माध्यमातून जनतेचे मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळण्यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करणे, स्वयंसेवी आरोग्य सेवकांचे जाळे निर्माण करणे व त्यांना प्रशिक्षित करणे तसेच आरोग्य शिबिर व मेळाव्यांचे आयोजन करुन जनआरोग्य सुव्यवस्थित राखण्यासाठी प्रयत्न करणे, आरोग्य व्यवस्थापनाकरिता छोटेखानी गाव किंवा शाळा दत्तक घेणे हे आरोग्य भारतीचे उद्देश आहेत. यासाठीच तालुका शाखेचे गठन करण्यात आले असून, अध्यक्षपदी डॉ. संदीप मेश्राम, उपाध्यक्षपदी डॉ. रहांगडाले, सचिवपदी राजेश मलघाटे, सहसचिवपदी संदीप खणंग, कोषाध्यक्षपदी रवींद्र वंजारी तर सदस्य म्हणून डॉ. कुमुद मेश्राम, डॉ. श्रद्धा रहांगडाले, दिगंबर ढोक, उमाशंकर पारधी, नितीन रोहिले, दुष्यंत रेभे, कपिल भोंडेकर व डॉ. मुकेश रामचंद्र यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी मार्गदर्शक म्हणून आरोग्य भारतीचे अखिल भारतीय संघटनमंत्री डॉ. अशोक वार्षनेय, पश्चिम प्रांत संयोजक मिलिंद ढगे, विदर्भ प्रांत उपाध्यक्ष डॉ. शाम कटरे, जिल्हाध्यक्ष शाम चंदनकर, सचिव पुष्कर बारापात्रे, मुकेश येरपुडे, अनुप कटारे, बी. बी. रहांगडाले, विठ्ठल मेश्राम, रोहित रहांगडाले आदी उपस्थित होते.