प्रस्तावित कोरोना वॉर्डासाठी अतिरिक्त डॉक्टर्सची व्यवस्था करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:26 AM2021-04-14T04:26:47+5:302021-04-14T04:26:47+5:30

गोंदिया : येथील केटीएस रुग्णालयाला लागूनच असलेल्या गर्ल्स स्कूलमध्ये कोरोनाबाधितांसाठी ५० बेडचे वॉर्ड तयार करण्याबाबत झालेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सहमती ...

Arrange additional doctors for the proposed corona ward | प्रस्तावित कोरोना वॉर्डासाठी अतिरिक्त डॉक्टर्सची व्यवस्था करा

प्रस्तावित कोरोना वॉर्डासाठी अतिरिक्त डॉक्टर्सची व्यवस्था करा

Next

गोंदिया : येथील केटीएस रुग्णालयाला लागूनच असलेल्या गर्ल्स स्कूलमध्ये कोरोनाबाधितांसाठी ५० बेडचे वॉर्ड तयार करण्याबाबत झालेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली होती. मात्र सोबतच डॉक्टर्सची कमी असल्याचे कारणही सांगितले होते. अशात या प्रस्तावित कोरोना वॉर्डसाठी अतिरिक्त डॉक्टर्सची अन्य जिल्ह्यांतून व्यवस्था करावी, अशी मागणी माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख व आरोग्य संचालक डॉ. लहाने यांच्याकडे फोनवर चर्चा करून केली आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे दररोज ६००-७०० रुग्ण निघत असून, यामुळे शासकीय व खासगी रुग्णालयांचे बेड भरले आहेत. एवढेच नव्हे तर शासकीय कोविड केअर सेंटरमध्येही आता जागा नसल्याचे अग्रवाल यांनी मंत्री देशमुख व आरोग्य संचालक डॉ. लहाने यांना सांगितले. शिवाय ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनची व्यवस्था करण्यास जिल्हा प्रशासन अपयशी ठरले आहे. इंजेक्शनसाठी रुग्णांचे ४-५ नातेवाईक शहरात मेडिकल-मेडिकल फिरत असून, कोरोनाचा प्रसार करीत आहे असेही त्यांनी सांगितले. अशात गर्ल्स स्कूलमध्ये वॉर्ड तयार झाल्यास रुग्णांची सोय होणार. मात्र उपचारासाठी डॉक्टर्सची गरज असल्याने व्यवस्था करण्याची मागणी अग्रवाल यांनी केली. यावर देशमुख यांनी गोंदियात अतिरिक्त डॉक्टर्स उपलब्ध करवून देण्याबाबत तसेच गर्ल्स स्कूलमध्ये अतिरिक्त वॉर्ड तयार करण्याचे निर्देश डॉ. लहाने यांना दिले आहे.

--------------------------------------

ऑक्सिजन व रेमडेसिविरसाठी मुख्य सचिवांशी चर्चा

जिल्ह्यात ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनच्या तुटवड्याबाबत अग्रवाल यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अवगत करवून देत त्यांना ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करवून देण्याबाबत चर्चा केली. यावर कुंटे यांनी कार्यवाही करून ऑक्सिजन व्यवस्था करण्याचे निर्देश संबंधिताना दिले आहेत.

Web Title: Arrange additional doctors for the proposed corona ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.