आठ दिवसांत अभियंत्याची व्यवस्था करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:25 AM2017-07-23T00:25:02+5:302017-07-23T00:25:02+5:30

तिरोडा पं.स., जि.प. बांधकाम व पाटबंधारे विभागामध्ये एकही स्थायी अभियंता नसल्याने विकास कामे रखडली आहेत.

Arrange the Engineer in eight days | आठ दिवसांत अभियंत्याची व्यवस्था करा

आठ दिवसांत अभियंत्याची व्यवस्था करा

Next

मनोज डोंगरे : रिक्त पदामुळे कामे खोळंबली, उपोषणाला बसण्याचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
काचेवानी : तिरोडा पं.स., जि.प. बांधकाम व पाटबंधारे विभागामध्ये एकही स्थायी अभियंता नसल्याने विकास कामे रखडली आहेत. याविषयी जि.प. गोंदियाचे कार्यकारी अभियंता यांनी पर्यायी व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
कवलेवाडा क्षेत्राचे जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी गोंदिया जि.प.चे कार्यकारी अभियंता बी.डब्ल्यू. कोहळे यांची भेट घेतली. यावेळी जि.प. सदस्य सुरेश हर्षे, पंधरे आणि गौतम उपस्थित होते. यावेळी जि.प. सदस्य डोंगरे यांनी तिरोडा पं.स. आणि अन्य विभागात दोन अभिंयते कार्यरत होते. त्या दोघांना हटविण्यात आले. मात्र त्या ठिकाणी एकही अभियंता देण्यात आला नाही.
कार्यकारी अभियंता जि.प. सार्वजनिक बांधकाम विभागाचे बी.डब्ल्यू. कोहळे यांना तिरोडा पं.स.मध्ये स्थायी एकही अभियंता नाही तर कामे कसे होणार? दोन्ही अभियंत्याला हटविण्यात आले तर त्या ठिकाणी नवीन अभियंता यांची व्यवस्था कशी काय करण्यात आली नाही असा सवालही जि.प.सदस्य मनोज डोंगरे यांनी केला.
पं.स.मध्ये कामानिमित्ताने गेल्यास अभिंयात नसल्याने कामे ठप्प पडली आहेत. अभियंता नसल्याने कामाचे बिल तयार करणे झालेल्या कामाचे मुल्यमापन करुन पास करणे असे अनेक कामे पडून आहेत.
पं.स. स्तरावर बांधकाम विभाग हे अतिशय महत्वाचे व जबाबदारीचे पद असताना नवीन अभियंत्याची नियुक्ती करण्यापूर्वीच अभियंत्याला कसे हटविले असा सवालही यावेळी उपस्थित केला.
या भोंगळ कारभारावर चिंता व्यक्त करण्यात आली. येत्या ८ ते १० दिवसात तिरोडा येथे अभियंत्याची व्यवस्था करण्यात आली नाही तर शांत बसणार नसून सहकाऱ्यांसोबत आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा जि.प. सदस्य डोंगरे यांनी कार्यकारी अभियंता बी.डब्ल्यू. कोहळे यांना दिला.
यावेळी उपस्थित जि.प. सदस्य सुरेश हर्षे आणि जि.प. सदस्य पंधरे यांनीही कार्यकारी अभियंता यांना त्वरित व्यवस्था करण्यात यावी, असे सूचविले. अन्यथा आम्ही जि.प.सदस्य मनोज डोंगरे यांच्यासह आमरण उपोषणाला बसृ असे कार्यकारी अभियंंता यांना सांगितले. कार्यकारी अभियंता सार्वजनिक यावर बी.डब्ल्यू. कोहळे यांनी यावेळी सांगितले की, अभियंत्याचे रिक्त पद भरण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांच्याशी चर्चा झाली आहे.
त्यांनी प्रतिनियुक्तीद्वारे रिक्त असलेले अभियंत्याचे पद त्वरीत भरण्याचे असे आश्वासन दिले. चर्चेदरम्यान पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते.

विकास कामांमध्ये अडथळे आणू नका
जनतेच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणे, क्षेत्रात विकासाचे कामे व्हायला पाहिजे. याला आम्ही प्राधान्य देत असतो. अधिकाऱ्यांनी यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला किंवा चुकीचे नियोजन करुन विकास कामे रोखण्याचा प्रयत्न केल्यास त्या अधिकाऱ्याला आम्ही कधीही सोडणार नाही. अधिकाऱ्यांनी याची समजूत घ्यावी असे जि.प. स्थायी समिती सदस्य सुरेश हर्षे म्हणाले.

 

Web Title: Arrange the Engineer in eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.