तत्काळ तिकीट बनविणाऱ्या दलालास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 11:52 PM2018-03-05T23:52:32+5:302018-03-05T23:52:32+5:30
गोंदियाच्या आरपीएफ टास्क टीमने राजनांदगाव येथील रेल्वे स्थानकाच्या मुख्य आरक्षण केंद्राजवळ तत्काळ आरक्षण तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास सोमवारी (दि.५) अटक केली.
आॅनलाईन लोकमत
गोंदिया: गोंदियाच्या आरपीएफ टास्क टीमने राजनांदगाव येथील रेल्वे स्थानकाच्या मुख्य आरक्षण केंद्राजवळ तत्काळ आरक्षण तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास सोमवारी (दि.५) अटक केली.
दपूम रेल्वे नागपूरचे मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे व सहायक सुरक्षा आयुक्त ए.के. स्वामी यांच्या मार्गदर्शनात गठित स्पेशल टास्क टीम गोंदियाचे उपनिरीक्षक विनेक मेश्राम, प्रधान आरक्षक जी.आर. मडावी, के.ए. अंसारी, आरक्षक पी.एल. पटेल, आर.के. श्रेष्ठा, आरक्षक के. प्रधान हे राजनांदगाव रेल्वे स्थानकाच्या मुख्य आरक्षण केंद्राजवळ तत्काल तिकिटांचा काळाबाजार व इतर गुन्ह्यांच्या गुप्त निरीक्षणासाठी तैनात होते.
दरम्यान आरोपी सोमवारी सकाळी १० वाजता एसी तत्काळ आरक्षण तिकीट काढून निघून गेला. तसेच पुन्हा ११ वाजता स्लीपर तत्काल आरक्षण उघडल्यावर तो तत्काल आरक्षण तिकीट बनविण्यासाठी आला. टास्क टीमला संशय आल्याने त्याला पकडले. त्याच्या हातातील तत्काळ आरक्षणाच्या तिकिटाबाबत चौकशी केल्यावर त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. तसेच आपले नाव व पत्ता सांगितला. त्याची झळती घेतल्यानंतर त्याच्याजवळ पूर्वी बनविलेले दुसरा आरक्षण तत्काळ तिकीट व तत्काळ आरक्षणाचे दोन गुलाबी फार्म, एक पेन मोबाईल व नगदी ७३० रूपये मिळाले. कारवाई दरम्यान गोंदिया ते सीएसटी व राजनांदगाव ते कोपरगाव अशा एकूण ५८५० किंमतीच्या आरक्षित तिकीट, पहिली तिकीट दोन प्रवाशांवर २०० रूपये कमिशनवर व दुसरी तिकीट त्याच्याच आॅर्डरवर विना कमिशन त्यात सरसकट कमिशनवर बनविल्याचे सांगितले. रेल्वे अधिनियमाच्या कलम १४३ अन्वये गुन्हा नोंद करून त्याला दस्तावेजांसह राजनांदगावच्या रेल्वे सुरक्षा दलाच्या ताब्यात देण्यात आले आहे.