रेल्वेची तिकीट विकणाऱ्या दलाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 09:44 PM2019-05-15T21:44:04+5:302019-05-15T21:45:27+5:30

रेल्वे सुरक्षा दलाच्या चमूने रेल्वेच्या ई तिकीट कार्यालयावर धाड घालून एका दलाला अटक केली. गुप्त माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई मंगळवारी (दि.१५) करण्यात आली.

The arrest of a railway ticket salesman arrested | रेल्वेची तिकीट विकणाऱ्या दलाला अटक

रेल्वेची तिकीट विकणाऱ्या दलाला अटक

Next
ठळक मुद्देगुप्त माहितीच्या आधारे धाड : रेल्वे सुरक्षा दलाच्या चमूची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रेल्वे सुरक्षा दलाच्या चमूने रेल्वेच्या ई तिकीट कार्यालयावर धाड घालून एका दलाला अटक केली. गुप्त माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई मंगळवारी (दि.१५) करण्यात आली.
सडक-अर्जुनीच्या पवन आॅनलाईन सर्विस, रेल्वे रिजर्वेशन सेंटरवर रेल्वे सुरक्षा बलाचे प्रभारी निरीक्षक नंदबहादूर,उपनिरीक्षक विनेक मेश्राम व त्यांच्या चमूने धाड टाकली. दुकान मालक दीपक उर्फ पंकज अवेंद्रसिंह (२८) आपल्या दुकानात हजर होते. रेल्वे आरक्षण तिकीटाच्या संदर्भात त्याला विचारणा केल्यावर व चौकशी केल्यावर त्याच्या बोगस पर्सनल आयडीने रेल्वेची अवैध पध्दतीने तिकीट बनवित असल्याचे स्पष्ट झाले.
दुकानात असलेल्या लॅपटॉपची माहिती घेतली. दीपक उर्फ पंकजने बोगस तिकिटे बनवित असल्याची कबुली दिली.सदर दुकानात असलेल्या लॅपटॉपची पाहणी केली असता १५ ई तिकीट तिथे आढळल्या.यासंदर्भात दीपक उर्फ पंकजच्या मते दुकानात पॅनकार्ड,पासपोर्ट बनविण्यासाठी ग्राहक येतात.तो एटीएम सर्विसचा अधिकृत एजेंट आहे.जे ग्राहक येतात त्यातील काही ग्राहकांना रेल्वेची तत्काल तिकीट बनवून देण्याची मागणी करतात.
तो आरआरसीटीसीचा अधिकृत एजेंट नसतांनाही अधिक पैसा कमविण्याच्या नादात आरआरसीटीसीच्या बोगस नावाने आयडी बनवून ग्राहकांची तिकीट बनवित असतो. त्याच्यावर अवैध व्यवसाय व रेल्वे अधिनियम कलम १४३ अंतर्गत कारवाई करण्यात आली. दस्तावेजाची तपासणी केल्यावर १५ ई तत्काल तिकीटाची किंमत २२ हजार ४१४ रूपये, २० हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप, १० हजार रूपये किंमतीचा एक प्रिंटर दीड हजार रूपये किंमतीचा राऊटर, ५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल व ८७० रूपये रोख असा ५८ हजार ९१४ रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.

Web Title: The arrest of a railway ticket salesman arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.