अवघ्या सहा तासांत खुनाच्या आरोपींना अटक

By admin | Published: May 26, 2017 12:33 AM2017-05-26T00:33:31+5:302017-05-26T00:33:31+5:30

सालेकसा तालुक्यातील पिपरिया बिटवर वनरक्षक म्हणून कार्यरत असलेले रविंद्रसिंग जतपेले

Arrested killers in just six hours | अवघ्या सहा तासांत खुनाच्या आरोपींना अटक

अवघ्या सहा तासांत खुनाच्या आरोपींना अटक

Next

वनरक्षकाची हत्या : स्थानिक गुन्हे शाखा व सालेकसा पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सालेकसा तालुक्यातील पिपरिया बिटवर वनरक्षक म्हणून कार्यरत असलेले रविंद्रसिंग जतपेले (५०) रा. सालेकसा यांचा खडखडी नाल्याच्या किणाऱ्यावर उभारीने मारून खून करण्यात आला होता. याबाबत सालेकसा पोलिसांनी २४ मे २०१७ रोजी भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. स्थानिक गुन्हे शाखा व सालेकसा पोलिसांनी आपली तपासचक्रे फिरवून अवघ्या सहा तासातच खुनाच्या आरोपींना अटक केली.
आरोपींमध्ये रेवाराम शेषराम नागपुरे (२३) रा. गवारीटोला (सालेकसा) व रवी धनराज उईके (२८) यांचा समावेश आहे. त्यांना बुधवारी २४ मे रोजी रात्रीदरम्यान अटक करण्यात आली.
सुरूवातीला सदर आरोपींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी सदर वनरक्षकाला उभारीने ठार मारून मृतदेह आपल्या मोटारसायकलने खडखडीटोल्याच्या नाल्याजवळ टाकून दिल्याची कबुली दिली.
घटनेच्या दिवशी मृतक आपली ड्युटी करून २३ मे रोजी रात्री ८.३० वाजता दरम्यान सालेकसा येथे मोटार सायकलने घरी परत जात होता. त्यांची मोटारसायकल हळूवार जात असताना आरोपींनी चालत्या मोटार सायकलवर व त्यांच्या डोक्यावर उभारीने मारून खाली पाडून ठार केले. नंतर मृतदेह मोटार सायकलने नाल्याजवळ नेवून टाकले. पूर्वी मृतक बिटगार्डने सदर दोन्ही आरोपींना मोटार सायकलने लाकडांची अवैध वाहतूक-तस्करी करताना पकडले होते. त्याचाच राग मनात ठेवून आरोपींनी त्याला ठार मारल्याचे सांगितले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी मंदार जवळे, सालेकसा येथील सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रताप वसगडे, पोलीस निरीक्षक भस्मे, नवखरे, बडवाईक, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, पोलीस हवालदार राजेश बडे, नायक पोलीस शिपाई धनंजय शेंडे, राजकुमार खोटेले, अतुल कराडे व इतर कर्मचाऱ्यांनी केली.

Web Title: Arrested killers in just six hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.