मोटारसायकल चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:28 AM2021-04-18T04:28:00+5:302021-04-18T04:28:00+5:30

गोंदिया : पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १६ एप्रिल रोजी मोटारसायकल चोरी करणाऱ्या अट्टल ...

Arrested for stealing a motorcycle | मोटारसायकल चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अटक

मोटारसायकल चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अटक

Next

गोंदिया : पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १६ एप्रिल रोजी मोटारसायकल चोरी करणाऱ्या अट्टल आरोपीला अटक केली. मयूर ऊर्फ गोल्डी भागवत ठवरे रा. टेकेपार डोडमाझरी ता. जिल्हा भंडारा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो चोरीची मोटारसायकल वापरत आहे अशी माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शखोच्या पोलिसांनी भंडारा येथील टेकेपार डोडमाझरी येथे सापळा रचून मयूृर ऊर्फ गोल्डी भागवत ठवरे (२१) रा. टेकेपार डोडमाझरी याला ताब्यात घेऊन विचारपूस केली.

त्याने गोपाल देवांगन ऊर्फ डिसकव्हर रा. छत्तीसगड याच्या सोबत फुटाळा सौंदड येथून एक टी.व्ही.एस.व्हिक्टर काळया रंगाची लाल काळया पटयाची मोटारसायकल चोरुन आणल्याचे कबूल केले. आरोपी मयूर ऊर्फ गोल्डी भागवत ठवरे (२१) रा. टेकेपार डोडमाझरी याने चोरुन आणलेल्या मोटारसायकलबाबत विचारपूस केली असता त्याने ती मोटारसायकलचे सर्व पार्ट वेगवेगळे करुन गावालगतचे शेतात तणसाचे ढिगाऱ्यात वेगवेगळया प्लॉस्टिकचे थैलीत ठेवल्याचे सांगितले. मोटारसायकलचे वेगवेगळे पार्ट ज्यात चेचीस, इंजिन, पेट्रोल टँक, व ईतर चिल्लर पार्ट काढून ठेवले होते. त्याच्याजवळून ३० हजार रूपये किंमतीचे पार्टस जप्त करण्यात आले. त्या आरोपीवर डुग्गीपार पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलीस ठाणे डुग्गीपारच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शखोचे पोलीस निरीक्षक महेश बन्सोडे, पोलीस उपनिरीक्षक अभय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संतोष यादव, सहाय्यक फौजदार गोपाल कापगते, पोलीस नायक तुलसीदास लुटे, पोलीस नायक बिसेन व चालक पोलीस शिपाई पांडे यांनी केली आहे.

Web Title: Arrested for stealing a motorcycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.