वर्षाकाठी ३७ हजार जनावरांचे कृत्रीम रेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 05:00 AM2020-08-23T05:00:00+5:302020-08-23T05:00:36+5:30
जिल्हा परिषद जिल्हा पशूसंवर्धन पदाची सुत्रे १५ नोव्हेंबर २०१६ डॉ. वासनिक यांनी हाती घेतली व सन २०१६-१७ मध्ये त्यांनी कामधेनू गावात रात्री मुक्काम हा उपक्रम जिल्ह्यात राबविला. पशुपालक, महिला बचत गट व शालेय विद्यार्थ्यांच्या यात समावेश केला. विभागाच्या गावातील शेवटच्या घटकापर्यंत संवाद प्रस्थापित करण्यासाठी व त्यातील तांत्रिक बाबी व पालकांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी त्यांनी हा उपक्रम योजिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जनावरांच्या वंधत्व निवारणासाठी व जिल्ह्यात दुग्ध उत्पादन वाढीसाठी जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. राजेश वासनिक यांनी जिल्ह्यातील पशूधनाचा चेहरा-मोहराच बदलून दिला आहे. सन २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील जनावरांचे कृत्रीम रेतन १७ हजार होते. परंतु आता जनावरांकडे विशेष लक्ष दिल्यामुळे दरवर्षी ३७ हजार जनावरांचे कृत्रीम रेतन जिल्ह्यात होत आहे.
जिल्हा परिषद जिल्हा पशूसंवर्धन पदाची सुत्रे १५ नोव्हेंबर २०१६ डॉ. वासनिक यांनी हाती घेतली व सन २०१६-१७ मध्ये त्यांनी कामधेनू गावात रात्री मुक्काम हा उपक्रम जिल्ह्यात राबविला. पशुपालक, महिला बचत गट व शालेय विद्यार्थ्यांच्या यात समावेश केला. विभागाच्या गावातील शेवटच्या घटकापर्यंत संवाद प्रस्थापित करण्यासाठी व त्यातील तांत्रिक बाबी व पालकांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी त्यांनी हा उपक्रम योजिला आहे. पशूसंवर्धन विभागाने तांत्रिक बाबींकडे विशेष लक्ष दिल्याने कृत्रिम रेतन संख्येत कमालीची वाढ झाली आहे. अधिकारी-कर्मचारी कार्यसुची तयार करण्यात आली.
सन २०१७-१८ मध्ये जागतिक अंडी दिवस संपूर्ण जिल्ह्यात राबवून जिल्हा परिषद सभागृहात मोफत अंडी वितरण करण्यात आले होते. पोषण आहारात अंडी समाविष्ट करण्याविषयी व्यापक प्रमाणात प्रबोधन करण्यात आले. अंडी उत्पादन व्यवसायाकडे नागरिकांचा दृष्टीकोण सकारात्मक झाला. कार्यालयाचे नूतनीकरण करून कुक्कुट विकास कार्यक्रम करण्यात आला. सालेकसा व देवरी या आदिवासी तालुक्यात महिला बचत गट यांच्याशी समन्वय साधून निवड झालेल्या लाभार्थ्यांना क्लस्टर स्वरूपात प्रशिक्षण देण्यात आले. प्रतिदिवस खाद्यपुरवठा करून आदिवासी महिलांना कुक्कुट पालनाची ओढ लावली.
सन २०१८-१९ मध्ये चारा वैरण विकास कार्यक्रमांतर्गत संपूर्ण जिल्ह्यात चाराचे महत्व सांगून हिरव्या वैरणातून दूध उत्पादनात कशी वाढ होते व त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी कशी येईल यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांना दुग्ध उत्पादनाकडे वळविले. न्यूट्री प्लेट सुपर व अन्य बहुवार्षिक चारा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. कर्मचाऱ्यांचे पशुपालकांच्या शेतावर जाऊन प्रशिक्षण देऊन त्यांना प्रोत्साहन करण्याचे काम डॉ. वासनिक केले.
२० दवाखाने आयएसओ
सन २०१९-२० ते २०२०-२१ या वर्षात जिल्ह्यातील २० पशुवैद्यकीय दवाखान्यांचे आयएसओ प्रमाणीकरण करण्यात आले. स्वच्छता, दस्तावेज, नोंदणी व प्रमाणीकरण अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रकारातून प्रतिसाद मिळाला. पशुसंवर्धन विभागाच्या विभागात आमूलाग्र बदल घडवून आणण्यात अग्रेसर असलेल्या डॉ. वासनिक यांची बदली आता वर्धा येथे झाली आहे.
राज्यात जिल्हा सन्मानजनक
येथील पशूसंवर्धन विभागाचे काम चांगले असल्याची पावती राज्याने दिली. या विभागात ५० टक्यांपेक्षा जास्त रिक्त पदे असल्याने परिचर परिवहन प्रतिबंधक यांनी प्रशिक्षण व प्रबोधन करून तांत्रिक कार्य वाढविण्यासाठी योगदान दिले. आयपी महत्वाकांक्षी योजना १०० टक्के उद्दीष्ट प्राप्ती केल्यामुळे गोंदियाला राज्यात सन्मानजनक स्थान मिळाले. प्रधान सचिव व तत्कालीन मंत्री जाणकार यांच्या उपस्थितीत पुणे येथील सभागृहात गोंदियाचा गौरव झाला. जालना येथील राष्ट्रीय पशू पक्षी प्रदूषण प्रदर्शनीत आमगाव येथील पशुपालक अशोक गायधने यांच्या वळूला राज्यातून प्रथम क्रमांक मिळाला होता.