कृत्रिम गुडघा फुलवू शकतो त्याचे जीवन

By admin | Published: June 27, 2016 01:54 AM2016-06-27T01:54:13+5:302016-06-27T01:54:13+5:30

शाळेतून घरी परतताना झालेल्या अपघातात डावा पाय गमावून बसला. पायाने अपंग झालेल्या त्या तरुणाने म्हाताऱ्या

The artificial knee can bear its life | कृत्रिम गुडघा फुलवू शकतो त्याचे जीवन

कृत्रिम गुडघा फुलवू शकतो त्याचे जीवन

Next

 आर्त हाक : वृद्ध मातेचा आधार बनण्याची त्याची धडपड
गोंदिया : शाळेतून घरी परतताना झालेल्या अपघातात डावा पाय गमावून बसला. पायाने अपंग झालेल्या त्या तरुणाने म्हाताऱ्या आईला आधार देण्यासाठी पैसे कमविण्याची इच्छा जाहीर केली. अपंगत्वावर मात करण्यासाठी त्याने कृत्रीम गुडघा बसवून दोन पैसे कमविण्याची तयारी करणाऱ्या तरुणाकडे ५५०० रूपये कमी असल्याने त्याला कृत्रीम गुडघा बसवून न देता जयपूर वरून परत पाठविण्यात आले. कृत्रीम गुडघ्या बसविण्यासाठी लागणाऱ्या मदतीसाठी तो अपंग शासन दरबारातील अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना मदतीची याचना करीत आहे.
दत्ता किशन राऊत (३५) रा. झोपडपट्टी क्रं. ९ रेल्वे स्टेशन हनुमान मंदिराजवळ गोंदिया असे त्या मदत मागणाऱ्या तरुणाचे नाव आहे. दत्ता पाचवीत असताना शाळेतून घरी परत येत होता. त्यावेळी भरधाव धावणाऱ्या ट्रकखाली त्याचा पाय आला. अपघातात त्याचा पाय चकनाचूर झाला. या अपघाताचा जबरधक्का दत्ताच्या वडीलाला बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. पतीचे निधन व मुलाचा अपघात या दोन्ही घटनांतून सावरणे कठिण होते. तरी देखील पती नसण्याचे दुख व चिमुकल्या मुलाने अपघातात गमवलेला पाय याचे दु:ख पचवून त्याच्या आईने मोलमजूरी करून दत्ताचे संगोपन केले. आज दत्ता ३५ वर्षाचा वयोगटात आहे. आई म्हातारी झाली आहे. आता आईला काम जमत नसल्याने आपण आईचे पालन पोषण करावे, यासाठी दत्ताने एका टेलरकडे काच बटन लावण्याचे काम शिकले. त्याला शिवणकामातून दोन पैसे कमविता यावे, यासाठी त्याने कृत्रिम गुडघा बसविल्यास त्याला शिवणकाम करून दोन पैसे मिळू शकतात. यासाठी त्याने कृत्रिम पाय बसविण्यासाठी दत्ताने लोकवर्गणीतून २० हजार गोळा करून जयपुर येथील डॉक्टरांना कृत्रिम पाय बसविण्याची विनंती केली. परंतु ५ हजार ५०० रुपये कमी असल्याचे सांगून उर्वरीत पैसे आणण्यासाठी डॉक्टरांनी त्याला कृत्रिम पाय बसवून न देता पुन्हा परत पाठविले आहे. घरात अठराविश्वे दारिद्र असतानाही त्याने कुणाकडे हात पसरविले नव्हते. परंतु लहानपनातच वडीलांच्या निधनानंतर आईने मोलमजुरी करून सांभाळ केला. परंतु म्हाताऱ्या आईला आता काही जमत नसल्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी त्याने स्वयंरोजगार करण्याचा चंग बांधला. परंतु पायाला चालता येत नाही म्हणून कृत्रिम पाय बसवून शिवणकाम करण्याचा त्याचा माणस त्याचा असल्याने त्याने कृत्रिम पाय गुडघ्यापासून वाकणारा असावा असे त्याला वाटले. त्यातून त्याने गुडघ्यापासून वाकणारा कृत्रिम पाय बसविण्यासाठी लागणारे पैसे गोळा केले. जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. चंद्रकांत पुुंलकुंडवार व जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी आपल्या सोईनुसार मदत केली. त्याने काही दिवसापूर्वी २० हजार रुपये गोळा करून मदत गोळा करून कृत्रिम पाय बसविण्यासाठी तो आईला घेऊन जयपुरला गेला. तेथील डॉक्टरांना २० हजार रूपये देऊन कृत्रीम पाय पसविण्याची विनंती केली. परंतु हा कृत्रिम पाय २५ हजार ५०० रुपयात येत असल्याचे सांगून डॉक्टरांनी त्याला परत पाठविले. उर्वरीत ५ हजार ५०० रुपयासाठी धडपड करीत आहे. कृत्रिम पाय बसवून आपण रोजी रोटीचा प्रश्न मिटवावा, अशी अपेक्षा उराशी बाळगून जयपुर येथे पाय बसविण्यासाठी गेलेल्या त्या तरूणाला पैसे कमी असल्यामुळे परत पाठविण्यात आले. गोंदियात परतलेल्या दत्ताने काही मदत मिळते का यासाठी जिल्हा परिषदेत जाऊन मदतीची याचना केली. परंतु आज त्याला प्रतिसाद न मिळाल्याने त्याने ज्यांच्याकडून मदत म्हणून जे पैसे घेतले ते पैसे परत करण्याचा माणस बांधला. कृत्रिम पाय बसविण्यासाठी आपण केलेल्या मदतीला पुर्णत्वास नेण्यास मदत करा अन्यथा मदत म्हणून दिलेले पैसे परत घ्या, अशी विनवणी तो अधिकाऱ्यांना करतांना दिसला. सामाजिक संस्था, समजोपयोगी काम करणाऱ्यांनी दत्ताला फक्त ५५०० रूपये मदतीची गरज असल्याने त्याला मदत केल्यास त्याचे जीवन फुलू शकते. आपल्या म्हाताऱ्या आईला चांगले दिवस दाखविण्याचे त्याचे स्वप्न आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The artificial knee can bear its life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.