पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी कार्यशाळा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:21 AM2021-06-03T04:21:32+5:302021-06-03T04:21:32+5:30
अर्जुनी मोरगाव : पक्ष्यांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो, निसर्गाची सुंदरता वाढते. सकाळी- सकाळी पक्ष्यांच्या सुमधुर आवाजाने माणूस ताजातवाना होतो. ...
अर्जुनी मोरगाव : पक्ष्यांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो, निसर्गाची सुंदरता वाढते. सकाळी- सकाळी पक्ष्यांच्या सुमधुर आवाजाने माणूस ताजातवाना होतो. पक्ष्यांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने स्थानिक प्रकृती नेचर फाउंडेशन व एसएसजे महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेत प्राचार्य डॉ. आश्विन चंदेल, प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. गोपाल पालीवाल, डॉ. शरद मेश्राम, डॉ. शरद देशमुख, डॉ. आशिष कावळे, प्रा. ओ.डी. लांजेवार, डॉ. मनोज बांगडकर, आश्विन गौतम, अरण्ययात्री वाइल्ड लाइफ फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुधीर भांडारकर व महाविद्यालयीन विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. ही कार्यशाळा दूरस्थ प्रणालीने घेण्यात आली.
मार्गदर्शक ग्रंथपाल प्रा. अजय राऊत यांनी पक्षी हासुद्धा एक जीव आहे. ऊन, वादळवारा, पाऊस व थंडीच्या काळात बचावासाठी घरट्याची गरज भासते. मानव हा दयाशील असतो. पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी घराघरांत लावल्याने ते आश्रयाला येतात. अशी कृत्रिम घरटी तयार केली जाऊ शकतात. ती कशी तयार करतात याचे प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखविले. मानवतेच्या दृष्टिकोनातून कृत्रिम घरटी तयार करून प्रत्येकाने आपापल्या घरासमोर लावण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. प्रकृती नेचर फाउंडेशन इच्छुकांना कृत्रिम घरटी तयार करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करणार असल्याचे ते म्हणाले. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. यावेळी डॉ. चंदेल, डॉ. पालीवाल, डॉ. मेश्राम यांनी मार्गदर्शन केले. डॉ. कावळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.