अर्जुनी जिल्हा बँकेतील अफरातफर ११ कोटींवर

By admin | Published: January 9, 2017 12:51 AM2017-01-09T00:51:49+5:302017-01-09T00:51:49+5:30

दि गोंदिया डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-आॅप बँकेच्या अफरातफर प्रकरणी आणखी दोन आरोपींना शनिवारी

Arunagar Bank's Arun Jain bank has Rs 11 crore | अर्जुनी जिल्हा बँकेतील अफरातफर ११ कोटींवर

अर्जुनी जिल्हा बँकेतील अफरातफर ११ कोटींवर

Next

लेखा परीक्षणात स्पष्ट : पाच वर्षानंतर आणखी दोन आरोपींना अटक
अर्जुनी मोरगाव : दि गोंदिया डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-आॅप बँकेच्या अफरातफर प्रकरणी आणखी दोन आरोपींना शनिवारी (दि.७) अटक करण्यात आली. आरोपींना १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. तब्बल पाच वर्षानंतर दोन आरोपींना अटक झाल्याने खळबळ माजली आहे. आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
स्थानिक मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत १६ फेब्रुवारी २०१२ रोजी १ कोटी ९४ लाख रुपयाची अफरातफर उघडकीस आली होती. खोटा हिशेब व बनावट दस्तावेज तयार करुन अफरातफर केल्याप्रकरणी त्यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात दिलीप तुळशीराम गायधने (४३), भूमेश्वर काशीराम चामलाटे (३०), विनोद यशवंत नाकाडे (३२), खेमराज उर्फ बंडू सोनवाने (३४), सुनील पंढरी देशमुख (३३), शैलेश धिरेंद्रसिंह बडगुजर (३४), देवीदास बाजीराव हेमणे (३५) व संदीप रतीराम कापगते (३२) या आठ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांचेविरुद्ध गुन्हा न्यायप्रविष्ट आहे.
सन २००६ ते २०११ या कालावधीत अफरातफर झाल्याने फेर लेखा परिक्षण करण्यात आले. सहकारी संस्था (साखर) नागपूरचे विशेष लेखा परीक्षक एम.एस. आटे यांनी ३० नोव्हेंबर २०१६ रोजी अहवाल सादर केला. यावरुन गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रामचंद्रम चंपालाल त्रिवेदी यांनी ५ जानेवारी २०१७ रोजी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. लेखा परीक्षणाच्या अहवालात अफरातफरीची राशी १० कोटी ८९ लाख ९७ हजार ३६६ रुपये असल्याचे समजते. याप्रकरणी आणखी अटक झालेल्या दोन आरोपीत जितेंद्र शामराव धरमशहारे (४०) देवरी तसेच तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय भालचंद्र पाटील (६६) भंडारा यांचा समावेश आहे.
त्यांचेविरुद्ध अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात कलम ४०९, ४१८, ४२०, ४६८, ४७१, ४७७ (अ), ४११, ४१३, १०९, ११४, १२० (ब), ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात अ ाला आहे. दोन्ही आरोपींना शनिवारी सकाळी अटक करण्यात आली आहे. आमगावचे उपविभागीय अधिकारी सचिन गुंजाळ या प्रकरणाचा तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Arunagar Bank's Arun Jain bank has Rs 11 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.