थर्ड लाइनच्या कामामुळे ४ ते २० ऑगस्ट दरम्यान तब्बल ७२ रेल्वेगाड्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 04:04 PM2024-08-03T16:04:37+5:302024-08-03T16:05:48+5:30
प्रवाशांना फटका : ४ ते २० ऑगस्टदरम्यान चालणार काम
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाअंतर्गत राजनांदगाव ते कळमना दरम्यान तिसऱ्या लाइनचे काम प्रगतिपथावर आहे. इलेक्ट्रनिक्स इंटरलॉकिंगचे कार्य सुरू असल्यामुळे ४ ते १३ ऑगस्ट व नॉन लॉकिंगच्या कामामुळे १४ ते २० ऑगस्टपर्यंत १६ प्रवासी गाड्या व ५६ जलद रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर अनेक गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
राजनांदगाव ते कळमना या २२८ किमी अंतरावर तिसऱ्या लाइनचे निर्माण कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. या प्रगतिपथावर असलेल्या लोहमार्गाच्या इंटरलॉकिंग व नॉन इंटरलॉकिंगच्या कामामुळे ४ ते २० ऑगस्टदरम्यान अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत प्रवासांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
७ ते १९ दरम्यान या रेल्वेगाड्या रद्द
डोंगरगड-गोंदिया- डोंगरगड क्र. ०८७११/१२, गाडी इतवारी मेमो गाडी क्र.०८७१३, इतवारी- गोंदिया मेमो गाडी क्र. ०८७१६, इतवारी-रामटेक गाडी क्र.०८७५६, रामटेक-इतवारी गाडी क्र. ०८७५१, इतवारी-रामटेक मेमो गाडी क्र. ०८७५४/५५, इतवारी-तिरोडा मेमो गाडी क्र. ०८ २८१/८२, तिरोडी- तुमसर-तिरोडी गाडी क्र. ०८२८३/८४, इतवारी-बालाघाट-इतवारी गाडी क्र. ०८७१४/१५, रायपूर-इतवारी-रायपूर गाडी क्र. ०८२६८/६७, कोरबा-इतवारी गाडी क्र. १८२३९, इतवारी-बिलासपूर-इतवारी गाडी क्र. १२८५६/५५, इतवारी-बिलासपूर गाडी क्र. १८२४०, टाटानगर गाडी क्र. १८१०९/१०, नागपूर-सहडोल-नागपूर गाडी क्र. ११२०१/०२, हावडा-अहमदाबाद-हावडा गाडी क्र. १२८३३/३४, हावडा-मुंबई गीतांजली गाडी क्र. १२८५९/६०, कोरबा- अमृतसर ही गाडी ४ ते ९ ऑगस्ट व १५ ऑगस्ट रोजी तर अमृतसर-बिलासपूर ही रेल्वेगाडी ६ ते ११ ऑगस्ट व १७ ऑगस्ट रोजी रद्द राहणार आहे. शालिमार गाडी क्र. १८०३०/२९ ही गाडी ११ ते १७ व १३ ते १९ ऑगस्टला रद्द राहणार आहे. याशिवाय अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर अनेक रेल्वे गाड्यांचा मार्ग बल्लारशा-गोंदिया या मागनि वळविण्यात आल्या आहेत.