आशा सेविकांचा उपविभागीय कार्यालयावर मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 06:00 AM2019-09-17T06:00:00+5:302019-09-17T06:00:16+5:30

महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटना (आयटक) च्या नेतृत्त्वात शहरातील पाल चौक येथून दुपारी १ वाजता मोर्चाला सुरूवात झाली. शहरातील मुख्य मार्गावरुन हा मूक मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला.शासनाने आशा सेविकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने याचा निषेध नोंदविण्यासाठी आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी तोंडाला काळा पट्या बांधल्या होत्या. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना देण्यात आले.

Asha Sevik's silent front on the sub-divisional office | आशा सेविकांचा उपविभागीय कार्यालयावर मूक मोर्चा

आशा सेविकांचा उपविभागीय कार्यालयावर मूक मोर्चा

Next
ठळक मुद्देउपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन : मागण्यां मंजूर करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विविध मागण्यांना घेऊन आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचे मागील ३ सप्टेंबरपासून बेमुदत आंदोलन सुरू आहे.मात्र शासनाने त्यांच्या मागण्यांची अद्यापही दखल न घेतली नाही. त्यामुळे आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी सोमवारी (दि.१६) उपविभागीय कार्यालयावर मूक मोर्चा काढून निषेध नोंदविला.
महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटना (आयटक) च्या नेतृत्त्वात शहरातील पाल चौक येथून दुपारी १ वाजता मोर्चाला सुरूवात झाली. शहरातील मुख्य मार्गावरुन हा मूक मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला.शासनाने आशा सेविकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने याचा निषेध नोंदविण्यासाठी आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी तोंडाला काळा पट्या बांधल्या होत्या. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना देण्यात आले. या वेळी दिलेल्या निवेदनातून आशा सेविका व गटप्रवर्तकांना महागाई भत्ता देण्यात यावा, १३ सप्टेंबरचे परिपत्रक रद्द करण्यात यावे, आशांना १५ हजार आणि गटप्रवर्तकांना २५ हजार रुपये मानधन देण्यात यावे. वयाच्या ६० वर्षांनंतर सेवानिवृत्ती वेतन देण्यात यावे, सर्वोच्य न्यायालयाच्या निर्देशानुसार आशा व गटप्रवर्तकांना कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा. आशांना प्राथमिक आरोग्य केंद्राऐवजी तालुका वैद्यकीय कार्यालयातून कामाचा मोबदला देण्यात यावा, आशा व गटप्रवर्तकांना प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वतंत्र खोली उपलब्ध करुन देण्यात यावी. आशांना ज्या कामांचा मोबदला दिला जात नाही ती कामे देण्यात येऊ नये, परिसरात फिरण्यासाठी आशा सेविकांना दुचाकी वाहन देण्यात यावे, दर महिन्याचा १० तारखेच्या आत आशा व गटप्रर्वतकांना मानधन देण्यात यावे, आशा सेविका आणि गटप्रर्वतकांच्या समस्या आणि तक्रारी मार्गी लावण्यासाठी तक्रार निवारण समिती गठीत करण्यात यावी. आदी मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष रामचंद्र पाटील, सचिव शालू कुथे, सहसचिव करुणा गणविर यांचा समावेश होता. मोर्चात जिल्हाभरातील आशा सेविका आणि गटप्रर्वतक मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते.
क्षुल्लक कारणातून महिलेला मारहाण
गोंदिया : दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम रतनारा येथे पाण्याची मोटर बंद केली यावरून आरोपी क्रमांक १ याने फिर्यादी कल्पना प्रकाश गणवीर (३०,रा.रतनारा) यांच्या डोक्यावर सिमेंट चौकटच्या तुकड्याने मारून जखमी केले. तर आरोपी क्रमांक २ याने थापडबुक्यांनी मारहाण व अश्लील शिविगाळ केली. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजतादरम्यान घडलेल्या या घटनेत दवनीवाडा पोलिसांनी भादंविच्या कलम ३२४, ३२३, २९४, ३४ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

Web Title: Asha Sevik's silent front on the sub-divisional office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.