आश्रम शाळा म्हणजे भावी पिढी घडविणारी संस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:09 AM2018-02-22T00:09:02+5:302018-02-22T00:09:15+5:30
आश्रम शाळा म्हणजे भावी पिढी घडविणारी संस्था आहे. पौराणिक काळात आश्रमातूनच शिक्षण दिले जात होते. विद्यार्थ्यांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे प्रतिपादन गोरेगाव येथील प्रा. किशोर पटले यांनी केले.
ऑनलाईन लोकमत
शेंडा (कोयलारी) : आश्रम शाळा म्हणजे भावी पिढी घडविणारी संस्था आहे. पौराणिक काळात आश्रमातूनच शिक्षण दिले जात होते. विद्यार्थ्यांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे प्रतिपादन गोरेगाव येथील प्रा. किशोर पटले यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरीच्या वतीने शेंडा येथील आश्रम शाळेच्या संकुलात विद्यार्थी, शिक्षक व पालक मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
महामानव बिरसा मुंडा, राजे शिवाजी महाराज व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांची पूजा करून माल्यार्पण करण्यात आले. उद्घाटन जि.प. सदस्य सरिता विलास कापगते यांच्या हस्ते, सहायक प्रकल्प अधिकारी व्ही.एम. टेंभुर्णीकर यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. या वेळी मार्गदर्शक व अतिथी म्हणून प्रा. किशोर पटले, सरपंच मोहनलाल बोरकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल पंधरे, उपसरपंच वच्छला मरस्कोल्हे, ग्रा.पं. सदस्य जितेश मानवटकर, रामदास चिचाम, प्रकाश पुराम, धृपता उईके, शालीनी बोरकर, जसुकला उईके, मालता उईके, कृपासागर जनबंधू, मंगल वैद्य, विलास कापगते, चंद्रमनी बन्सोड, छत्रपाल परतेकी, यशवंत सलामे, अनिल पंधरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रा. पटले पुढे म्हणाले, शिक्षणाशिवाय मनुष्य काहीच करू शकत नाही. याचे अनेक उदाहरणे सादर करून ते म्हणाले, शिक्षण हे वाघिनीचे दूध आहे. त्याला जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.
विद्यार्थ्यांना लहानपणापासून घडविण्याची जबाबदारी आई व पालकांची असते. पाल्य शिक्षण घेतेवेळी त्यांच्या हालचालीवर नजर ठेवणे गरजेचे आहे. पालकांनी आपल्या पाल्यासंबंधी शाळा प्रशासनाशी वेळोवेळी संबंध साधून त्यांच्या शालेय प्रगतीविषयाी माहिती घ्यावी. शासनाकडून मिळणाºया निधीचा वापर स्वत:साठी न करता शिक्षण साहित्यावरच खर्ची घालावा. शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांसोबत जवळीक साधून त्यांना स्वत:ची मुले समजून त्यांच्याशी हितगूज करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
प्रास्ताविकातून मुख्याध्यापक एम.डी. बारसागडे यांनी शाळेचा कार्यवृत्तांत सादर करताना विद्यार्थी, शिक्षक व पालक मेळाव्याचे आयोजन का करण्यात येते, यावर माहिती दिली. या वेळी माजी उपसरपंच छत्रपाल परतेकी, सरपंच मोहनलाल बोरकर, टेंभुर्णीकर, सरिता कापगते यांनीही विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. यानंतर विद्यार्थ्यांनी राष्टÑगीत, लावणी व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
संचालन प्रा.व्ही.डी. खडतकर यांनी केले. आभार मुख्याध्यापक एस.डी. बारसागडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.