दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केली पीक पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 08:27 PM2017-11-06T20:27:27+5:302017-11-06T20:27:44+5:30
तालुक्यात अल्प पावसामुळे बहुतांश शेतकºयांची रोवणी न झाल्यामुळे शेतकºयांसमोर दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : तालुक्यात अल्प पावसामुळे बहुतांश शेतकºयांची रोवणी न झाल्यामुळे शेतकºयांसमोर दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. याची नुकसानभरपाई शासनाकडून मिळावी याकरिता तिरोडा, गोरेगाव विधानसभेचे आ. विजय रहांगडाले व जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी येडमाकोट, मनोरा, केसलवाडा, सितेपार, मुरमाडी व वडेगाव या गावांना भेटी देवून पीक परिस्थितीचा आढावा घेतला.
या वेळी त्वरित शेतकºयांच्या शेतीचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीला भेट देवून यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पाण्याचे नियोजन करुन पाण्याची कमतरता भासणार नाही, यासाठी सरपंचांनी नियोजन करावे. गावातील सार्वजनिक विहिरी तसेच बोअरवेल यांची तपासणी करुन आवश्यकता असेल तर तांत्रिक अधिकाºयांच्या माध्यमातून विहिरीमधील गाळ काढण्यात यावी. तसेच विंधन विहिरींची पातळी वाढविण्याकरिता पाईप वाढविण्यात यावे व पाण्याचा योग्य वापर करुन नियोजन करण्यात यावे.
पुढे आमदारांनी पीक विमा विषयावर बोलताना सांगितले, पीक विमा योजनेकरिता मंडळ हा निकष न ठेवता गाव हा निकष ठेवून पीक विमा काढण्यात यावा. तसेच यावर्षी ज्या गावामध्ये कृषी सहाय्यक किंवा कृषी विभागाने केलेला सर्वे हा शासनाकडे पाठविण्याअगोदर चावडी वाचनाच्या माध्यमातून जनतेसमोर ठेवावा. त्यामुळे नुकसानग्रस्त एकही शेतकरी वंचित राहणार नाही, असे म्हटले.
जिल्हाधिकारी काळे यांनी दुष्काळ परिस्थितीवर प्रकाश टाकत येत्या ८ तारखेपासून रोजगार हमी योजनेचे कामे त्वरित सुरु करण्याचे आदेश गटविकास अधिकाºयांना दिले. त्यामुळे जनतेस रोजगार मिळण्यास मदत होईल. सद्या शासनाने जिल्ह्यात मध्यम दुष्काळ जाहीर केला असून काही भागांमध्ये काहीही रोवणे न लागल्यामुळे पूर्ण दुष्काळ जाहीर करण्यासंबंधी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे आदेश आमदारांनी जिल्हाधिकाºयांना दिले.
पीक परिस्थितीची पाहणी करताना उपवन संरक्षक युवराज, उपविभागीय अधिकारी गंगाधर तळपाते, तहसीलदार संजय रामटेके, तालुका कृषी अधिकारी पोटदुखे, तालुका उपनिबंधक प्रमोद हुमणे, गटविकास अधिकारी जावेद इनामदार, कृषी सहायक एल.के. रहांगडाले, येडमाकोटचे सरपंच राजू कापसे, मनोराचे सरपंच राजेश पेशने, केशलवाडाचे सरपंच कुकडे, सेलोटपारचे सरपंच हलमारे, वडेगावचे सरपंच तुमेश्वरी बघेले, नीरज सोनेवाने व आदी उपस्थित होते.