पुनर्वसन पॅकेज त्वरित वाटप करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 11:26 PM2017-09-22T23:26:34+5:302017-09-22T23:26:47+5:30
तालुक्यातील बिरसी विमानतळामुळे प्रकल्पबाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना सरकारने त्वरीत मोबदला वाटप करावा, अशी मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शासनाकडे लावून धरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
्नेगोंदिया : तालुक्यातील बिरसी विमानतळामुळे प्रकल्पबाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना सरकारने त्वरीत मोबदला वाटप करावा, अशी मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शासनाकडे लावून धरली. प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात आढावा बैठक घेतली.
बिरसी प्रकल्पग्रस्तांना ३८ कोटी रुपयांचे पुनर्वसन पॅकेज मंजूर करण्यात आले. मात्र या पॅकेजचे प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यास विलंब केला जात आहे. त्याचीच दखल आ.अग्रवाल यांनी प्रकल्पग्रस्तांना त्वरीत पॅकेजची रक्कम देण्यात यावी. पॅकेज वाटपातील अडचणी त्वरीत दूर करण्यात याव्या. यासाठी मंत्रालयात नुकतीच आढावा बैठक घेतली. बैठकीला विमान प्राधिकरणाचे विभागीय कार्यकारी संचालक के.एल.शर्मा आणि संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पॅकेज वाटपाला विलंब होत असल्याबाबत अग्रवाल यांनी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. बिरसी येथील प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन पॅकेज मंजूर होवून जवळपास १० वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही पॅकेजची रक्कम प्रकल्पग्रस्तांना मिळालेली नाही. बिरसी विमानतळामुळे प्रकल्पबाधीत झालेल्यांना घरांचा आणि जमिनीचा मोबदला अद्यापही देण्यात आला नाही. विमान प्राधिकरणाकडून विविध कारणे देत टाळटाळ करण्याचा प्रकार योग्य नसल्याचे सांगत अग्रवाल यांनी अधिकाºयांना चांगलेच फटकारले. विमानतळामुळे कामठा-परसवाडा या मार्गाचे अधिग्रहणाचे काम पूर्ण होईपर्यंत हा मार्ग ये-जा करण्यासाठी खुला ठेवण्याचे आणि रस्त्याची दुरूस्ती करण्याचे निर्देश अग्रवाल यांनी दिले.