देशी दारु हटविण्याचे दिले आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 10:07 PM2017-09-10T22:07:03+5:302017-09-10T22:07:31+5:30

रिसामा येथील देशी दारु दुकान हटविण्याच्या मागणीला घेऊन गुरुवारपासून महिलांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती.

Assured to remove country ammunition | देशी दारु हटविण्याचे दिले आश्वासन

देशी दारु हटविण्याचे दिले आश्वासन

Next
ठळक मुद्देपाच महिला गंभीर : अधिकाºयांच्या भेटीनंतर उपोषण सुटले

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : रिसामा येथील देशी दारु दुकान हटविण्याच्या मागणीला घेऊन गुरुवारपासून महिलांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. उपोषणाच्या तिसºया दिवशी पाच महिलांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या उपोषण मंडपाला वरिष्ठ अधिकाºयांनी भेट देऊन महिलांना उपोषण सोडण्यास भाग पाडले.
रिसामा येथील देशी दारु दुकान हटविण्याच्या मागणीला घेऊन रिसामा येथील महिलांनी तीव्र आंदोलन छेडले होते. यात महिलांसोबत दारुड्यांची हुज्जत बाजी झाली. महिलांना धमकविणाºया ठाणेदारांसंदर्भात महिलांमध्ये तीव्र असंतोष होता. तिसरा दिवस उजाडताच उपोषण मंडपात बसलेल्या १५ महिलांपैकी पाच महिलांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून शनिवारी (दि.९) राज्य उत्पादन शुल्क विभागाचे चिलमुलवार, तहसीलदार साहेबराव राठोड, आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश नवले व इतर अधिकाºयांनी सायंकाळी उपोषण मंडपाला भेट देऊन महिलांची समजूत काढली. सदर देशी दारु दुकान हटविण्यासाठी वरिष्ठांना अहवाल पाठविण्यात आला असून त्यावर लवकरच कारवाई होणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच उपोषणावर बसलेल्या महिलांचे उपोषण सोडविण्यात आले.
या दारू दुकानामुळे रिसामा येथील समाजस्वास्थ धोक्यात आले होते. महिलांना हे नकोसे झाल्यामुळे त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सदर दारू दुकान हटविण्याच्या मागणीला घेऊन गुरूवार पासून उपोषण सुरू केले होते. कोणत्याही राजकारण्यांची मदत न घेता त्यांनी सुरू केलेल्या या उपोषणाला सर्व गावकºयांनी पाठींबा दर्शविला. उपोषणावर बसलेल्या महिलांशी दारूड्यांचा वादही झाला. धक्काबुक्की झाली तरीही महिलांनी न घाबरता आपला लढा सुरूच ठेवला. उपोषणावर तृप्ती बहेकार, हेमलता पागोटे, लीला मेंढे, गीता ब्राम्हणकर, सरस्वता भांडारकर, सरस्वता हेमने, भागरथा पागोटे, माजी सरपंच फुलन चुटे, निर्मला बोहरे, रता पागोटे, मालन तुमसरे, इंदू ब्राम्हणकर, शोभा मेंढे बसल्या होत्या. निंबू पाणी पाजून त्यांचे उपोषण सोडविण्यात आले.

पाच महिला रुग्णालयात
उपोषणावर बसलेल्या महिलांपैकी सुशीला बहेकार, तृप्ती बहेकार, छबू उके, सरस्वता हेमने, लिला मेंढे या महिलांची प्रकृत खालावल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. यापैकी तृप्ती बहेकार, छबू उके व लिला मेंढे या तिघ्या उपोषण सुटल्यानंतरही बेशुध्दच होत्या. रात्रभर त्यांच्यावर ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले.

Web Title: Assured to remove country ammunition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.