एटीएम व गोदाम केले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2022 05:00 AM2022-02-19T05:00:00+5:302022-02-19T05:00:03+5:30

आर्थिक वर्षाचा शेवट जवळ आला असून कर विभागाने सोमवारपासून कर वसुलीला सुरुवात केली आहे. यांतर्गत शुक्रवारी (दि.१८) कर वसुली पथकाने शहरातील मरारटोली परिसरातील युनियन बॅंकेचे एटीएम सील केले. तर पन्नालाल दुबे वॉर्डातील एक गोदामही सील करण्यात आले आहे. पन्नालाल दुबे वॉर्डात सील करण्यात आलेल्या गोदामावर सन २०११ पासून १ लाख ७५ हजार रुपयांची थकबाकी आहे. तर एटीएमवर सन २०१५-१६ पासून ८१ हजार रुपयांची थकबाकी आहे.

ATMs and warehouses sealed | एटीएम व गोदाम केले सील

एटीएम व गोदाम केले सील

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नगर परिषदेेने पुन्हा मालमत्ता कर वसुलीला सुरुवात केली असून यांतर्गत कर विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि.१८) शहरातील  एक एटीएम तसेच एक गोदामावर सीलिंगची कारवाई केली आहे. या मालमत्तांवर एकूण २ लाख ५६ हजार रुपयांची थकबाकी आहे. कर वसुली विभागाने सोमवार नंतर आता शुक्रवारी दुसरी सीलिंगची कारवाई केली आहे. 
गोंदिया नगर परिषदेत पूर्वी कर वसुलीच्या आड राजकारण येत होते व त्यामुळे मालमत्ता कराची थकबाकी कोट्यवधींच्या घरात पोहोचली आहे. अशात नगर परिषदेला विकास कामे करताना अडचण येत होती. तेथेच मागील २ वर्षांपासून कोरोनामुळे परिस्थिती आणखीच गंभीर झाली आहे. मात्र मागील वर्षापासून नगर परिषदेने कर वसुलीची पद्धत बदलली असून त्याचा चांगलाच फायदा मिळत आहे. आता कुणाचीही गय न करता थकबाकीदारांवर थेट कारवाई करण्याचे निर्देश मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी दिले. त्यानुसार, विभागाकडून चांगले निकालही मागील वर्षी नगर परिषदेला मिळाले. 
आता आर्थिक वर्षाचा शेवट जवळ आला असून कर विभागाने सोमवारपासून कर वसुलीला सुरुवात केली आहे. यांतर्गत शुक्रवारी (दि.१८) कर वसुली पथकाने शहरातील मरारटोली परिसरातील युनियन बॅंकेचे एटीएम सील केले. 
तर पन्नालाल दुबे वॉर्डातील एक गोदामही सील करण्यात आले आहे. पन्नालाल दुबे वॉर्डात सील करण्यात आलेल्या गोदामावर सन २०११ पासून १ लाख ७५ हजार रुपयांची थकबाकी आहे. तर एटीएमवर सन २०१५-१६ पासून ८१ हजार रुपयांची थकबाकी आहे. 

थकबाकीचा आकडा घटला 
- पाहिजे त्या प्रमाणात कर वसुली होत नसल्याने मालमत्ता कराची थकबाकी कोट्यवधींच्या घरात पोहोचली आहे. त्यातही चालू मागणीपेक्षा थकबाकीचा आकडा जास्त असायचा. मात्र मागील वर्षी कर विभागाने केलेल्या कर वसुलीने थकबाकी आकडा आता चालू मागणीपेक्षा कमी दिसून येत आहे. यंदा नगर परिषदेची ५ कोटींची चालू मागणी असून तीन कोटी ९ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यात ३१ जानेवारीपर्यंत ३ लाख ११ हजार रुपयांचीच वसुली झाली आहे. मोहिम सुरू झाल्याने त्यात आता भर पडणार. 

प्रत्येक वॉर्डासाठी विशेष वसुली पथक
मालमत्ता कर वसुलीसाठी आता प्रत्येक वॉर्डामध्ये विशेष वसुली पथक जाणार आहे. कर भरल्यास पथक रहिवासी मालमत्ता, दुकान, कोचिंग क्लास, शासकीय, निमशासकीय थकीत मालमत्ताधारकांवर जप्तीची कारवाई करणार आहे. 
- विशाल बनकर, उपमुख्याधिकारी, न.प., गोंदिया

 

Web Title: ATMs and warehouses sealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Taxकर