जुनी पेन्शनसाठी पालकमंत्र्यांच्या घरावर हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:10 AM2019-01-28T00:10:02+5:302019-01-28T00:10:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचाºयांना जूनी पेंशन योजना लागू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचाºयांना जूनी पेंशन योजना लागू करावी यासाठी महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या घरावर कर्मचाऱ्यांनी रविवारी (दि.२७ ) हल्लाबोल आंदोलन केले. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्री बडोले यांना दिले.
महाराष्ट्रात मागील तीन वर्षापासून सुरू असलेल्या जूनी पेंशन लढ्याची शासनाकडून अवहेलना केली जात आहे महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन हक्क संघटना महाराष्ट्रात मजबूत आहे. संघटनेची बांधणी प्रत्येक तालुक्यात आहे. याच जोरावर आजवर नागपूर, मुंबई येथे राजव्यापी आंदोलने करण्यात आली. परंतु शासनाकडून आश्वासनांच्या व्यतिरिक्त काहीच मिळाले नाही. म्हणून पुन्हा एकदा कर्मचाºयांनी जो जूनी पेंशन देण्याच्या मनस्थितीत असेल त्यांचाच यापुढे विचार करायचा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात कर्मचाऱ्यांनी नो पेंशन नो वोट ही मोहीम सुरू केली आहे. आजपर्यंत हजारो डिसीपीएस, एनपीएसधारक कर्मचारी सेवेत असताना मृत्युमुखी पडले. मात्र त्यांच्या वारसानांना कुठलीही आर्थिक मदत मिळाली नाही. त्यांच्या कुटुंबाला शासनाने वाºयावर सोडले आहे.अशा कुटुंबांना फॅमीली पेंशन, ग्रॅच्युटी लागू करावी. एकीकडे आणिबाणीत कारावास भोगलेल्यांना पेंशन, लोकप्रतिनिधींना पेंशन व मुळात जूनी पेंशन ही त्या कर्मचाऱ्याने आयुष्यभर केलेल्या सेवेच्या उतारवयात मिळणारे फळ असताना तो नाकारण्याचा अधिकार शासनाला आहे का असा सवाल कर्मचाºयांनी उपस्थित केला आहे.
शासनाला आपली जबाबदारी झटकून चालणार नाही. तर सरसकट कर्मचाºयांच्या हक्काची जूनी पेंशन योजना सुरू करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. याच मागणीसाठी संघटनेच्या नेतृत्त्वात कर्मचाºयांनी रविवारी (दि.२७) पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या घरावर हल्लाबोल आंदोलन केले. आंदोलनात राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, जिल्हाध्यक्ष राज कडव, राज्य प्रसिध्दी प्रमुख संदीप सोमवंशी, सचिव सचिन राठोड, प्रविण सरगर, मुकेश रहांगडाले, किशोर डोंगरवार, हितेश रहांगडाले, चंदु दुर्गे, सुनील चौरागडे, शितल कनपटे, सुभाष सोनेवाने, जीवन म्हशाखेत्री, भूषण लोहारे, चिंतामन वलथरे, विनोद गहाणे, संजय उके, हुमेंद्र चांदेवार, शालीक कठाणे, अजित रामटेके, अजय तितिरमारे, अनमोल उके, अमोल खंडाईत, रवी काशिवार, विलास लंजे, गणेश कांगणे, मंगेश जांभूळकर, एकनाथ लंजे, विजेंद्र केवट, सचिन सांगोळे, गणेश सिंगणजुडे, अविनाश पाटील, सोहन कापगते, रामेश्वर गोंडाणे यांचा समवेश होता.