गुणवंतांच्या सत्कारातूनच मिळते इतरांना प्रेरणा

By Admin | Published: June 28, 2017 01:35 AM2017-06-28T01:35:39+5:302017-06-28T01:35:39+5:30

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे हा गुणवंताच्या पाठीवरील थाप आहे. या यशाचे भागीदार शिक्षक,

Attainment of quality honors others | गुणवंतांच्या सत्कारातूनच मिळते इतरांना प्रेरणा

गुणवंतांच्या सत्कारातूनच मिळते इतरांना प्रेरणा

googlenewsNext

अनिल मंत्री : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे हा गुणवंताच्या पाठीवरील थाप आहे. या यशाचे भागीदार शिक्षक, पालक व विद्यार्थी हे तिन्ही घटक आहेत. शिक्षणाला संस्काराची जोड आवश्यक आहे. विद्यार्थ्यात आपल्या क्षमतेनुसार आवडीचे क्षेत्र निवडावे ज्यांना आई, वडील, शिक्षक यांचे थोरपण कळले ते मोठे झाले. आज गुणवंताचा सत्कार होत आहे. हा सत्कार हा त्यांना प्रेरणा देणारा क्षण असतो असे उद्गार संस्थेचे सचिव तथा प्राचार्य अनिलकुमार मंत्री यांनी काढले.
सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात वर्ग १० व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष डॉ. वल्लभदास भुतडा, पर्यवेक्षिका वीणा नानोटी, जी.एम.बी.हायस्कूलचे प्राचार्य मुकेश शेंडे, सरस्वती विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक हरिदास गहाणे, पालकशिक्षक संघ उपाध्यक्ष सत्यवान शहारे, देवराम चांदेवार, सुनिता डांगे, सरीता शुक्ला उपस्थित होते.
प्रास्ताविक शाळेच्या पर्यवेक्षिका वीणा नानोटी यांनी मांडले. याप्रसंगी भ्रमर पुस्तोडे, प्रांजली कोचे, अमित देवाडे, सोनल साखरे, अपर्णा नागपुरे, येश्विनी निर्वाण या गुणवंतानी तसेच मुरलीधर रुखमोडे, सुषमा नागपुरे, प्रा.अविनाश चव्हाण, श्रावण देव्हाडे या पालकांनी आपल्या मनोगतातून शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी संस्थाध्यक्ष डॉ. भुतडा व संस्था सचिव मंत्री यांच्या हस्ते वर्ग १० वी १२ वी तील गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांना गुणपत्रिका, सन्मानचिन्ह तसेच वृक्षाचे रोपटे देवून सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्ती राज्यातून वर्ग १० वीच्या परीक्षेत १०० टक्के गुण घेऊन प्रथम आलेली शाळेची विद्यार्थीनी प्रांजली प्रभाकर कोचे, भ्रमर पुस्तोडे, रजनी शिवणकर, गीतेश्वरी नाकाडे, अपर्णा नागपुरे, पायल शहारे, दुलिचंद मस्के, भूपेंद्र डोंगरवार, संजय भुरले, संजना कापगते, यिशांत दहीकर, गायत्री कापगते, खुशबू शहारे, गायेश कापगते, सागर चांदेवार, श्वेता चव्हाण, रोहण राघोर्ते, नुतन लंजे, वैभव मस्के, मोनाली ठाकरे, श्रध्दा बडोले, गोविंद पनपालिया, जयेश रुखमोडे, श्रध्दा खुणे, शर्वरी सांगोडे, माविया अनग पठाण, येश्विनी निर्वाण, जीएमबी हायस्कूलचे विद्यार्थी अनिल देव्हावडे, मयंक कापगते, हर्षित बोरकर, कृष्णा गांधी, मयूर मिश्रा, सोनल साखरे, आचल मेश्राम, अंकीत निखारे, कोमल जौठानी या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. चहांदे यांच्या तर्फे स्व. गेडाम सर स्मृती पारितोषीक ५०० रुपये देण्यात आले. संचालन प्रा. इंद्रनिल काशिवार यांनी केले. आभार छाया घाटे यांनी मानले.

Web Title: Attainment of quality honors others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.