भजन-कीर्तनातून सरकारला जागविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 09:36 PM2019-07-23T21:36:55+5:302019-07-23T21:38:01+5:30
तालुक्यातील जनतेच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने ग्राम मुंडीकोटा येथील बाजार चौैकात धरणे आंदोलन करण्यात आले. भगवंताची पूजा- अर्चना व भजन-किर्तनातून करण्यात आलेल्या या जनआक्र ोश आंदोलनातून कार्यकर्त्यांनी सरकारला जागविण्याचा प्रयत्न केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : तालुक्यातील जनतेच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने ग्राम मुंडीकोटा येथील बाजार चौैकात धरणे आंदोलन करण्यात आले. भगवंताची पूजा- अर्चना व भजन-किर्तनातून करण्यात आलेल्या या जनआक्र ोश आंदोलनातून कार्यकर्त्यांनी सरकारला जागविण्याचा प्रयत्न केला. तसेच सोमवारी (दि.२२) तहसीलदार संजय रामटेके यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात, कृषी पंपावरील लोडशेडींग बंद करून कृषीपंपांना २४ तास वीज पुरवठा द्यावा, कृषीपंप धारकांना वीज जोडणी देऊन सोलर पंपची अट रद्द करा, धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे पाणी घाटकुरोडा व चांदोरी बु. पर्यंत द्या, शेतकऱ्यांची सरसकट क र्जमुक्ती करा, तिरोडा तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करा, सालेबर्डी ते चांदोरी बु., देव्हाडा मार्ग दरूस्त करा, घरकुल प्रपत्र-३ मध्ये घरकुल मंजूर करा, वीज दर कमी करा, तुमसर-गोंदिया बस सेवा वाढवा, रासायनिक खतांची किंमत कमी करा, बेरोजगारांना शासनाने नौकरी द्यावी किंवा नवीन कंपन्या सुरू कराव्या, महामार्गांवर शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर जाण्यासाठी वेगळा मार्ग करून द्यावा तसेच घरकुल धारकांना बांधकामाचा १८ हजार ५०० रूपयांचा उर्वरीत हप्ता द्यावा आदि मागण्यांचा समावेश आहे.
निवेदन देताना, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार दिलीप बंसोड, जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन, महला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, सभापती निता रहांगडाले, सामाजिक न्याय विभाह जिल्हाध्यक्ष मनोज डोंगरे, उपसभापती मनोहर राऊत, जिल्हा परिषद सदस्य कैलास डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य प्रिती रामटेके, जिल्हा परिषद सदस्य सुनिता मडावी, किशोर पारधी, नत्थु अंबुले, प्रदीप मेश्राम, माया शरणागत, जया धावडे यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.