बँकाकडून कर्जमाफीची माहिती लपविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:49 AM2017-10-28T00:49:28+5:302017-10-28T00:49:39+5:30
चावडी वाचनानंतर कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या बँक खात्यात गुरूवार (दि.२६)पासून कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : चावडी वाचनानंतर कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या बँक खात्यात गुरूवार (दि.२६)पासून कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र शुक्रवारी (दि.२७) दुसºया दिवशीही जिल्ह्यातील किती शेतकºयांच्या बँका खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली. याची माहिती बँकाकडेच उपलब्ध नव्हती. शिवाय ही माहिती लपविण्याचा प्रयत्न बँकाकडून केला जात आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेनंतर्गत शेतकºयांना कर्जमाफी जाहीर करण्यात आली. यासाठी जिल्ह्यातील ६९ हजार शेतकरी पात्र ठरले. तर ९५ हजार शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केले होते. बँका आणि सहकार उपनिंबधक कार्यालयाने अर्जांची छाननी व चावडी वाचन करुन यापैकी जेवढ्या शेतकºयांचे अर्ज पात्र ठरले. त्या शेतकºयांच्या बँक खात्यात गुरूवार (दि.२६) पासून कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार होती. चावडी वाचन आणि अर्जांच्या पडताळणीनंतर नेमके किती शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले, किती शेतकºयांच्या खात्यात दोन दिवसात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली.
यासंदर्भातील माहिती जिल्हा अग्रणी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व इतर बँकेच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता, त्यांनी या संदर्भात सध्या कुठलीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले. माहिती देण्यासंदर्भात वरिष्ठांकडून निर्देश नसल्याचे सांगितले.
एकंदरीत बँकाकडून कर्जमाफीची माहिती देण्यास टाळटाळ करुन माहिती लपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर काही बँकाचे अधिकारीच कजमाफीच्या माहितीपासून अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे. त्यामुळे विविध शंकाना पेव फुटले आहे.
विभागणीनंतरही समस्या
सहकार उपनिंबंधक कार्यालयाने कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या अर्जांची छाननी करुन त्या अर्जांची ग्रीन, येलो, रेड अशा तीन रंगात विभागणी केली. ग्रीन यादीतील अर्ज पात्र, रेड यादीतील अर्ज अपात्र आणि येलो रंगाच्या यादीतील अर्जांमध्ये त्रृट्या असल्याची विभागनी केली होती. मात्र यानंतरही शेतकºयांनी केलेल्या आॅनलाईन अर्जाचे आधार क्रमांक एकसारखे व काही अर्जांमध्ये बºयाच त्रृट्या असल्याची माहिती आहे. अर्जांची छाननी करणाºया आयटी विभागाच्या कर्मचाºयांसमोर सुध्दा अडचण निर्माण झाल्याची माहिती आहे.
शेतकरी वाºयावर
शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकºयांना थोडाफार दिलासा मिळाला होता. मात्र आता कर्जमाफीची प्रक्रिया दिवसेंदिवस अधिक किचकट केली जात आहे. त्यामुळे शेतकरी सुध्दा बँका आणि तहसीलकार्यालयाच्या चकरा मारुन हैराण झाले आहे. शेतकºयांना बँकाकडून योग्य माहिती मिळत नसल्याने ते देखील वाºयावर असल्याचे चित्र आहे.