खेळाडूंना राज्य व राष्ट्रीयस्तरावर पाठविण्यासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 08:35 PM2018-12-27T20:35:11+5:302018-12-27T20:35:26+5:30
ग्रामीण संस्कृतीत वसलेला कबड्डीचा खेळ आता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जात आहे. कबड्डीच्या देशी खेळातून युवकांची खेळाप्रती आवड वाढते. तसेच स्वस्थ शरीर व मनाची निर्मिती होत असून युवकांत सांघिक भावना निर्माण होते. त्यामुळे या स्पर्धेतील प्रतिभावान खेळाडंूना राज्य व राष्ट्रीयस्तरावर पाठविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ग्रामीण संस्कृतीत वसलेला कबड्डीचा खेळ आता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जात आहे. कबड्डीच्या देशी खेळातून युवकांची खेळाप्रती आवड वाढते. तसेच स्वस्थ शरीर व मनाची निर्मिती होत असून युवकांत सांघिक भावना निर्माण होते. त्यामुळे या स्पर्धेतील प्रतिभावान खेळाडंूना राज्य व राष्ट्रीयस्तरावर पाठविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
आमदार चषक प्रौढ कबड्डी स्पर्धेंतर्गत तालुक्यातील ग्राम कामठा येथील अंतीम सामन्यातील विजेत्या ग्राम ढाकणी येथील संघाला पुरस्कृत करताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समिती सभापती रमेश अंबुले यांनी, कामठा येथे क्रीडा संकुल बांधकाम तसेच शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज, मेडिकल कॉलेज व नर्सिंग कॉलेज आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नांचे प्रतिक आहे. तर दुसरीकडे मात्र भाजपकडून युवांना धोका देण्याचे काम केले जात असल्याचा आरोप केला.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, जिल्हा सचिव गेंदलाल शरणागत, प्रकाश रहमतकर, लता दोनोडे, चमन बिसेन, सावलराम महारवाडे, आनंद तुरकर, आशिष चव्हाण, मनोज दहीकर, धनलाल ठाकरे, विजय लोणारे, अर्जुन नागपुरे, दिनेश अग्रवाल, अजय गौर, एस.ए.वहाब, अनिल सहारे, पी.जी.कटरे, विठोबा लिल्हारे, उषा शहारे, गिरीष पालीवाल, विजय टेकाम, दिपक पवार, माधुरी कुंभरे, ज्योती वालदे, सरिता कापगते, ओमप्रकाश भक्तवर्ती, स्नेहा गौतम, प्रमिला करचाल, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनिल मते, जयप्रकाश बिसेन, हरिचंद कावडे गावकरी उपस्थित होते.
आता दरवर्षी राज्यस्तरीय प्रौढ कबड्डी स्पर्धा
आमदार चषक कबड्डी स्पर्धेत १५० हून अधीक संघातील १५०० हून अधीक खेळाडूंनी सहभाग घेतला. या उत्स्फुर्त प्रतिसादाला बघता आमदार अग्रवाल यांनी कबड्डीला प्रोत्साहन मिळावे यासाठी आता दरवर्षी राज्यस्तरीय प्रौढ कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्याची घोषणा केली. एवढेच नव्हे तर कामठा येथे अक्षयतृतीयेला सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्याचीही घोषणा केली. तसेच क्रीडा संकुल तयार झाल्यानंतर जास्तीत जास्त क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणार असल्याचे आश्वासन दिले.