अधिकाऱ्यांना प्रेम व सहकार्य आवश्यक
By admin | Published: April 19, 2015 12:51 AM2015-04-19T00:51:28+5:302015-04-19T00:51:28+5:30
जिल्हाधिकारी म्हणून काम करताना येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्यावर भरभरुन प्रेम केले आणि तेवढेच सहकार्य सुद्धा दिले.
निरोप समारंभ : अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीचे आयोजन
गोंदिया : जिल्हाधिकारी म्हणून काम करताना येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्यावर भरभरुन प्रेम केले आणि तेवढेच सहकार्य सुद्धा दिले. समन्वय समितीने अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाची महत्वाची भूमिका पार पाडली. काम चांगले करण्यासाठी हे प्रेम व सहकार्य असणे अधिकाऱ्यांसाठी आवश्यक असते, ते मी विसरू शकणार नाही, असे भावनिक उद्गार स्थानांतरित जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांनी काढले.
गोंदिया जिल्हा अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने डॉ.सैनी यांची कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर गोंदियात त्यांचा निरोप व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. त्या कार्यक्रमात डॉ. सैनी बोलत होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना, भंडारा जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा वनसंरक्षक संजय ठवरे, उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.विजय केवलिया, वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ.दीपक बाहेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी अधिकारी कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवि धकाते होते.
डॉ.सैनी पुढे म्हणाले, समन्वय समितीने समन्वयाची भूमिका भविष्यातही पार पाडावी. आज माझा झालेला सत्कार पाहून मी भारावून गेलो असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाला सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता कृष्णा जनबंधू, उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरिश कळमकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुराम, वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र जैन, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता विलास निखारे, लोखंडे, भवरे, साबळे, शिक्षणाधिकारी खंडागळे, उपविभागीय अधिकारी एन.के. राव, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक गिरे, देवरीचे राजमाने, देवरे, वाघचौरे सुधीर कार्लेकर, जयपुरिया, गुजर, अविनाश काळदाते, किरण कबाडी उपस्थित होते. यावेळी डॉ.संदीप पखाले, दिलीप गावडे, डॉ.दीपक बाहेकर यांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक समन्वय समितीचे जिल्हा सचिव दुलीचंद बुद्धे यांनी संचालन डी.यु. रहांगडाले यांनी तर आभार कार्यकारी अभियंता संजय कटरे यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)