पैसे आणले नाही म्हणून आॅटो जाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 09:03 PM2018-05-06T21:03:28+5:302018-05-06T21:03:28+5:30
रोजगार सेवकाकडून खंडणीचे एक लाख ५० हजार रूपये आणले नाही म्हणून नक्षलवाद्यांनी एकाचा आॅटो जाळला. देवरी तालुक्यातील ग्राम ढिवरीनटोला (पुराडा) येथे शनिवारी मध्यरात्री २.३० वाजतादरम्यान ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रोजगार सेवकाकडून खंडणीचे एक लाख ५० हजार रूपये आणले नाही म्हणून नक्षलवाद्यांनी एकाचा आॅटो जाळला. देवरी तालुक्यातील ग्राम ढिवरीनटोला (पुराडा) येथे शनिवारी मध्यरात्री २.३० वाजतादरम्यान ही घटना घडली.
सविस्तर असे की, देवरी तालुक्यातील ढिवरीनटोला (पुराडा) हे गाव सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येते. गुरूवारी (दि.३) रात्री १० वाजताच्या सुमारास ६ नक्षलवाद्यांनी ढिवरीनटोला गाठून तेथील धनराज रामलाल उईके (२८) यांना रोजगार सेवकासंदर्भात विचारपूस केली. तसेच रोजगार सेवकाकडून एक लाख ५० हजार रूपये घेऊन ठेव अशी धमकी देऊन निघून गेले. मात्र उईके यांनी यासंदर्भात काहीच केले नाही व रोजगार सेवकाकडून पैसे आणले नाही. यामुळे शनिवारी (दि.५) मध्यरात्री २.३० वाजतादरम्यान बंदूकधारी ३ नक्षलवाद्यांनी धनराज रामलाल उईके (२८) यांना झोपेतून उठविले. तसेच काम केले नाही यामुळे त्यांच्या आॅटोरिक्षातील डिझेल टाकून आॅटो जाळला. आॅटो जळाल्याने ुउईके यांचे ४० हजारांचे नुकसान झाले. तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी भादंविच्या कलम २३४,३८५, ४३५, ४५२, १४३, १४७, १४८,१४९, सहकलम ३,२५ भारतीय हत्यार कायदा सहकलम १८,२०,२३ बेकायदेशिर हालचाली प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.