ऑटो टिप्परची निविदा पुन्हा ‘पेंडींग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 05:00 AM2019-11-12T05:00:00+5:302019-11-12T05:00:06+5:30

शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण करून तो संकलीत करता यावा, यासाठी नगर परिषदेला शासनाकडून ३३ ऑटो टिप्पर खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार, नगर परिषदेने कोट्यवधी रूपये खर्चून हे ३३ ऑटो टिप्पर खरेदी केले. ते जुलै महिन्यात नगर परिषदेत आले. मात्र ते ऑटो टिप्पर चालविण्यासाठी नगर परिषदेकडे मनुष्यबळ नसल्याने नगर परिषदेने ऑटो टिप्परसाठी १० जुलै रोजी ३३ चालक व ३३ हमालांसाठी निविदा टाकली.

Auto Tipper Tender Again 'Pending' | ऑटो टिप्परची निविदा पुन्हा ‘पेंडींग’

ऑटो टिप्परची निविदा पुन्हा ‘पेंडींग’

Next
ठळक मुद्देआता मुख्याधिकाऱ्यांची वाट : कोट्यवधींचे ऑटो टिप्पर होताहेत भंगार

कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : निविदा उघडण्याकडे झालेल दुर्लक्ष, त्यानंतर निविदा उघडण्यात आल्यावर आचारसंहितेमुळे कार्यादेश देता येत नव्हते. तसेच संबंधित कंत्राटदाराची नगर परिषदेकडे सुरक्षा ठेव नसल्याने नियमानुसार आठ दिवसांचा कालावधी त्यांना देण्यात आला होता. अशात ही निविदा प्रक्रीया येथेच अडकून पडली होती. या प्रकीयेला दिड महिना लोटून गेल्यानंतरही निविदेचा सोक्षमोक्ष लागलेला नसून आता मुख्याधिकाऱ्यांची वाट बघितली जात असल्याने निविदा ‘पेंडींग’ आहे.
शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण करून तो संकलीत करता यावा, यासाठी नगर परिषदेला शासनाकडून ३३ ऑटो टिप्पर खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार, नगर परिषदेने कोट्यवधी रूपये खर्चून हे ३३ ऑटो टिप्पर खरेदी केले. ते जुलै महिन्यात नगर परिषदेत आले. मात्र ते ऑटो टिप्पर चालविण्यासाठी नगर परिषदेकडे मनुष्यबळ नसल्याने नगर परिषदेने ऑटो टिप्परसाठी १० जुलै रोजी ३३ चालक व ३३ हमालांसाठी निविदा टाकली. मात्र या निविदेकडे दुर्लक्ष झाल्याने ३३ ऑटो टिप्पर आता नगर परिषद कार्यालयाच्या परिसरात धूळ खात पडून आहेत.
याबाबत ‘लोकमत’ने १८ सप्टेंबर रोजी ‘कोट्यवधींचे ऑटो टिप्पर धूळखात’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करून हा प्रकार पुढे आणला होता. या बातमीची दखल घेत नगर परिषदेने त्याचदिवशी निविदा उघडली. मात्र काही तांत्रीक अडचण आल्याने १९ तारखेला दरपत्रक उघडण्यात आले. विशेष म्हणजे, यामध्ये खडकी (पूणे) येथील एका एजंसीने निविदा रकमेच्या २ टक्के दर कमी टाकल्याने त्यांना हे काम देता येते. मात्र नियमानुसार, संबंधिताला आठ दिवसांच्या आत निविदा रकमेच्या १ टक्के रक्कम सुरक्षा ठेव म्हणून जमा करावयाची होती. शिवाय विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागणार असल्याने निविदा प्रक्रीया अडकली होती.
आता मात्र या प्रकरणाला दिड महिना होत असतानाही ऑटो टिप्परच्या प्रक्रीयेत नेमके काय झाले हे कुणालाही ठाऊक नाही. शिवाय संबंधित या निविदे प्रक्रीयेबाबत काही बोलण्यास तयार नाहीत. सध्या मुख्याधिकारी चंदन पाटील सुटीवर असल्याने ते आल्यावरच पुढे काय ते ठरविले जाणार असल्याचे बोलले जात आहे. म्हणजेच, आता या निविदेचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी मुख्याधिकाºयांची वाट बघितली जात असून ही निविदा पुन्हा ‘पेंडींग’ पडून आहे.

जुलैपासून सुरू आहे निविदा प्रक्रिया
प्राप्त माहितीनुसार, नगर परिषदेने चालक व हमाल पुरवठ्यासाठी १० जुलै रोजी निविदा टाकली. १४ ऑगस्ट रोजी ही निविदा उघडण्यात येणार होती. मात्र त्यात काही अडचण आल्याने दोनवेळा शुद्धीपत्रक टाकून तारीख वाढविण्यात आली व त्यानुसार ३० ऑगस्ट ही शेवटची तारीख होती. मात्र निविदा उघडण्यात आली नाही. यादरम्यान ‘लोकमत’ मध्ये बातमी प्रसिद्ध होणार असल्याने नगर परिषदेने आपली बाजू सावरत १८ सप्टेंबर रोजी निविदा उघडली. त्यानंतर संबंधित कंत्राटदाराची सुरक्षा ठेव नसल्यामुळे व आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रीया अडकली होती. त्यात आता मुख्याधिकारी नसल्यामुळे त्यांची वाट बघितली जात आहे. यातून नगर परिषद प्रशासन व संबंधित विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो.
ऑटो टिप्परचे साहित्य चालले चोरीला
नगर परिषदेने खरेदी केलेले हे ३३ ऑटो टिप्पर नगर परिषद कार्यालय परिसरात दोन महिन्यांपासून पडून आहेत. यांच्याकडे कुणाचेही लक्ष नसल्याने ऑटो टिप्पर मधील बॅटरी व अन्य साहित्य चोरीला जात असल्याचीही माहिती आहे. नगर परिषदेकडून याबाबत नकार दिला जात असला तरिही कित्येकांकडून याबाबत सांगीतले जात आहे. शिवाय कित्येक वाहनांच्या चाकातील हवा निघाली असून ते उभे असल्याने त्यांची दुरूस्तीच करावी लागणार असल्याचे दिसते. अशात आता निविदेचा सोक्षमोक्ष लागण्यासाठी किती दिवस लागतात व तोपर्यंत या वाहनांतील आणखी किती साहित चोरीला जाते हे बघायचे आहे.

Web Title: Auto Tipper Tender Again 'Pending'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.