रेल्वे गाड्यांची सरासरी गती वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 10:36 PM2018-04-02T22:36:05+5:302018-04-02T22:36:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेमध्ये सध्या कलमना ते काचेवानीपर्यंत १०१ किमीचा १३ ब्लॉक स्टेशनचा रेल्वे मार्ग व गोंदिया ते गुदमापर्यंत १२ किमीचा एक ब्लाक स्टेशनचा रेल्वे मार्ग पूर्णत: आॅटोमेटिक सिग्नल प्रणालीयुक्त करण्यात आला आहे. या आॅटोमेटिक सिग्नल प्रणालीमुळे दपूम रेल्वेच्या गाड्यांच्या सरासरी गतीत मोठी वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे आपल्या कार्यक्षेत्रातून धावणाऱ्या गाड्यांची गती वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. प्रवाशांना याचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, यामागे हा हेतू आहे. या दृष्टीने सिग्नल व टेलीकम्युनिकेशन विभाग गाड्यांच्या परिचालनात सर्वाधिक महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. गाड्यांना दर किलोमीटर सुरक्षितरित्या समोर वाढविताना गाड्यांचा क्रम सतत विनाअडथळ्याने अबाधित रहावा व आपल्या गंतव्यापर्यंत सुरक्षितरित्या पोहोचविण्यासाठी सदर विभाग कार्य करीत आहे. गाड्यांना आणखी अधिक गती प्रदान करण्याच्या दृष्टीने सिग्नल व टेलीकम्युनिकेशन विभागाद्वारे आॅटोमेटिक सिग्नल प्रणाली क्रमबद्ध पद्धतीने लागू करून बहुआयामी लाभ प्रदान करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
रेल्वेमध्ये आतापर्यंत एका स्थानकापासून दुसºया स्थानकाचे अंतर पार केल्यानंतरच सिग्नल हिरवे होते. तेव्हाच दुसऱ्या गाडीला त्या मार्गावर समोर जाण्यासाठी सोडले जाते. परंतु आता काही रेल्वे मार्गांमध्ये आॅटोमेटिक सिग्नल प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्या मार्गांवर प्रत्येक किलोमीटरमध्ये सिग्नल लावण्यात आले आहेत. त्यामुळे एका स्थानकातून सुटून दुसऱ्या स्थानकावर पोहोचण्यापर्यंत जवळपास प्रत्येक किलोमीटरवर लागलेल्या सिग्नलवरून गेल्यावर गाडीच्या योग्य स्थितीची माहिती मिळते.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेमध्ये सध्या कलमना ते काचेवानीपर्यंत १०१ किमीचा १३ ब्लॉक स्टेशनचा रेल्वे मार्ग व गोंदिया ते गुदमापर्यंत १२ किमीचा एक ब्लॉक स्टेशनचा रेल्वे मार्ग पूर्णत: आॅटोमेटिक सिग्नल प्रणालीयुक्त करण्यात आला आहे. याशिवाय बिलासपूर ते जयरामनगरपर्यंत १४ किलोमीटर, बिलासपूर ते बिल्हा स्टेशनपर्यंत १६ किमी व बिलासपूर ते घुटकू स्थानकापर्यंत १६ किमीच्या रेल्वे मार्गांना आॅटोमेटिक सिग्नल प्रणालीयुक्त करण्याची स्वीकृती प्राप्त झाली आहे.
गाड्यांना ट्रेस करणे होणार सुगम
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेमध्ये आॅटोमेटिक सिग्नल प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूपाने अनेक लाभ रेल्वे प्रवासी व दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या ग्राहकांना होणार आहे. संपूर्णपणे आॅटोमेटिक सिग्नल प्रणाली लागू झाल्यास रेल्वे मार्गांच्या क्षमतेत मोठी वृद्धी होईल. त्यामुळे प्रत्येक गाडीच्या सरासरी गतीत मोठी वाढ होईल. गाड्यांना किमी दर किमी ट्रेस करणे सुगम होईल. त्यामुळे कोणत्याही एका मार्गावर गाड्यांच्या जमावाची स्थिती बनणार नाही. या प्रणालीतून संरक्षणाच्या दृष्टीने गाड्यांच्या परिचालनात चांगली सुधारणा होईल. त्यामुळे आॅटोमेटिक सिग्नल प्रणाली सर्व दृष्टीने सुविधाजनक व लाभदायक सिद्ध ठरण्याची शक्यता आहे.