स्वयम प्रकल्पातून बालमृत्यूला आळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 11:50 PM2018-03-05T23:50:00+5:302018-03-05T23:50:00+5:30

कुपोषण व उपजत बालमृत्यूला आळा बसावा. तसेच लाभार्थी गटातील महिलांचा आर्थिक दर्जा उंचवावा या उद्देशाने उमेदच्या माध्यमातून भरनोली येथे स्वयम प्रकल्प उभारण्यात येत आहे.

Avoid child deaths from the project itself | स्वयम प्रकल्पातून बालमृत्यूला आळा

स्वयम प्रकल्पातून बालमृत्यूला आळा

Next
ठळक मुद्देमहत्त्वाकांक्षी योजना : पालकमंत्री राजकुमार बडोले हस्ते भूमिपूजन

आॅनलाईन लोकमत
राजोली : कुपोषण व उपजत बालमृत्यूला आळा बसावा. तसेच लाभार्थी गटातील महिलांचा आर्थिक दर्जा उंचवावा या उद्देशाने उमेदच्या माध्यमातून भरनोली येथे स्वयम प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्यामुळे बालमृत्यूला आळा घालण्यास मदत होणार असल्याचे उमेदच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कुपोषण, महिला सबलीकरण व उद्योजगता या मुख्य उद्देशाने शासनाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद) माध्यमातून भरनोली येथे स्थापन करण्यात येणाऱ्या स्वयम प्रकल्पाचे (मदर युनिट) भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते शनिवारी (दि.३) पार पडले.
याप्रसंगी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, माजी सभापती प्रकाश गहाणे, पं.स. सदस्य रामलाल मुंगणकर, तानाजी ताराम, जिल्हा अभियान व्यवस्थापक अनिल गुंजे, तालुका व्यवस्थापक रेशिम नेवारे, प्रभाग समन्वयक भावे, ग्रामसंघाचे अध्यक्ष जमदाळ, सरपंच प्रमिला कोरामी उपस्थित होते.
महिलांनी आत्मनिर्भर बनण्यासाठी गटाच्या माध्यमातून एकत्र यावे. बचय गटातील महिलांच्या विकासासाठी आवश्यक ती मदत करणार असल्याचे या वेळी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले. उपस्थित अन्य मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हा व्यवस्थापक (उमेद) प्रविण भांडारकर यांनी मांडले.
काय आहे स्वयम प्रकल्प
स्वयम प्रकल्पांतर्गत भरनोली येथे उमेद अभियानाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले ग्रामसंघाच्या वतीने २० बाय ५० फूट आकाराचे कुक्कुट पक्षी शेड तयार करण्यात येणार आहे. ग्रामसंघ शेडमध्ये अंडी देणाºया गुणवत्ताधारक प्रजातीच्या कुक्कुट पिल्ल्यांचे संगोपन केले जाईल. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने निवडलेल्या ४१७ अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना तीन टप्प्यामध्ये प्रति लाभार्थी ४५ पक्षी वाटप केले जातील. ३ महिन्यानंतर लाभार्थी महिला कुक्कुट पक्ष्यांच्या अंड्याचा पुरवठा एकात्मिक बालविकास कार्यालयांतर्गत सुरू अंगणवाड्यांमधील मुले, लाभार्थी स्तनदा माता, गरोदर स्त्रिया यांना केला जाईल. त्या मोबदल्यात पक्षीपालक लाभार्थी महिलेस ८-१० रूपये प्रति अंडी याप्रमाणे रक्कम मिळेल. त्यामुळे कुपोषण व उपजत बालमृत्यूला आळा बसण्यास मदत होईल. तसेच लाभार्थी गटातील महिलांचा आर्थिक दर्जा सुधारेल, असे उमेद अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक प्रविण भांडारकर यांनी सांगितले.

Web Title: Avoid child deaths from the project itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.