शुद्ध पाणी व ताजा आहार घालणार साथरोगांना आळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 10:23 PM2019-06-29T22:23:31+5:302019-06-29T22:24:46+5:30

मागील तीन वर्षात जिल्ह्यातील दोन गावात साथरोगांचा उद्रेक झाला. जिल्ह्यात यात्रा भरणारी १६ गावे आहेत. नदीच्या काठावर ८१ गावे असून गोंदिया जिल्ह्यातील एकूण ९९ गावे जोखीमग्रस्त आहेत. या गावांसाठी आरोग्य विभागाने स्पेशल प्लान तयार केला आहे. साथरोगावर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी उपकेंद्रांपासून सर्व आरोग्य संस्थांत औषधसाठा मुबलक प्रमाणात ठेवण्यात आला आहे.

Avoid eating pure water and fresh food with the patients | शुद्ध पाणी व ताजा आहार घालणार साथरोगांना आळा

शुद्ध पाणी व ताजा आहार घालणार साथरोगांना आळा

Next
ठळक मुद्देगरोदर-स्तनदा माता व बालकांची लाईन लिस्टींग तयारचर्चेतील व्यक्तीशी थेट संवादसंडे स्पेशल मुलाखत

नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मागील तीन वर्षात जिल्ह्यातील दोन गावात साथरोगांचा उद्रेक झाला. जिल्ह्यात यात्रा भरणारी १६ गावे आहेत. नदीच्या काठावर ८१ गावे असून गोंदिया जिल्ह्यातील एकूण ९९ गावे जोखीमग्रस्त आहेत. या गावांसाठी आरोग्य विभागाने स्पेशल प्लान तयार केला आहे. साथरोगावर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी उपकेंद्रांपासून सर्व आरोग्य संस्थांत औषधसाठा मुबलक प्रमाणात ठेवण्यात आला आहे.
पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत असलेल्या विहीर, बाअ‍ेरवेल, नळ योजना मधील पाण्याची पातळी वाढत असते. गढूळ पाण्यामुळे सुक्ष्म जीवांची वाढ होते. त्यातून डायरीया, गॅस्ट्रो, कॉलरा, काविळ, टायफॉईड इत्यादी आजारांचा उद्रेक होतो. या आजारांवर आळा घालण्यासाठी नागरिकांनी शुद्ध व सुरक्षीत पाणी आणि ताजा आहार घ्यावा, जेणे करून या साथरोगांना आळा घालता येईल, अशी माहिती जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. भुमेश्वर पटले यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीतून सांगितली.
शुद्ध आणि संरक्षित पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत व नगर परिषद यांची असते. परंतु या स्थानिक स्वराज्य संस्था काही वेळा आपल्या कामात दुर्लक्ष करीत असल्याने गावात साथरोग पसरतात. पावसाळ्याचे तीन महिने पुरेल एवढ्या ब्लिचींग पावडरचा साठा ग्रामपंचायतींनी आपल्याकडे ठेवावा. यात ३३ टक्यापेक्षा जास्त क्लोरीनचे प्रमाण असलेले ब्लिचींग पावडर ग्रामपंचायतीने खरेदी करावे. ब्लिचींग पावडर खरेदीनंतर तपासणीसाठी प्रयोगशाळेत गोंदियाला पाठवावे. पाण्याची टाकी महिन्यातून तीन वेळा धुवून स्वच्छ करावी. पाईप व नळ व्हॉल्व लिकेज होणार नाही याची दक्षता घ्यावी, नळ योजनेंतर्गत ज्या गावाला पाणी पुरवठा करण्यात येते ते पाणी पुरवठा करण्याच्या एक तासाअगोदर क्लोरीनेशन करून ओ.टी. परीक्षण करून क्लोरीनचे प्रमाण योग्य असल्याची खात्री झाल्यानंतरच पाणी पूरवठा करण्यात यावे. दूषित पाण्याच्या स्त्रोतावर त्वरीत शुद्धीकरणाची प्रक्रिया करावी. नागरिकांनी जेवण करण्यापूर्वी हात धुवावे, शौचालयातून बाहेर आल्यावर साबनाने हात धुवावे, शिळे व उघड्यावरील अन्न खाऊ नये, आपला परिसर स्वच्छ ठेवावा, शेणखत व उकीरडे हे वास्तव्यास असलेल्या ठिकाणापासून दूर ठेवावे, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.
साथरोगासंदर्भात माहितीसाठी किंवा साथरोगासंदर्भात लागणाऱ्या मदतीसाठी आरोग्य विभागाने १०४ ही टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. जिल्हास्तरावर नियंत्रण केंद्र असून त्याचा क्रमांक ०७१८२- २३११३६ असा आहे. १ जून ते २ आॅक्टोबर या काळात हे नियंत्रण केंद्र सुरू राहणार आहे. साथ रोगावर वेळीच आळा घालण्याच्या दृष्टीकोणातून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले आहेत. सात दिवस २४ तास याप्रमाणे या नियंत्रण कक्षात एक तंत्रज्ञ व एक परिचर अशा दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे. रूग्णवाहीका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. ६७ प्रकारच्या साथरोगांसाठी लागणारा औषधीसाठा प्रत्येक आरोग्य संस्थेत पोहचविण्यात आला असल्याचेही डॉ.पटले म्हणाले. साथ रोगांचा उद्रेक झाल्यास लागणाºया २१ प्रकारच्या इव्हीडेमीक किट प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षात उपलब्ध करण्यात आल्या आहेत अशी माहितीही त्यांनी मुलाखतीतून दिली.

Web Title: Avoid eating pure water and fresh food with the patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.