तणावमुक्त वातावरणात काम करून रक्तदाब टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:30 AM2021-05-19T04:30:13+5:302021-05-19T04:30:13+5:30

गोंदिया : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोगप्रतिबंध कार्यक्रमांतर्गत येथील केटीएस जिल्हा रुग्णालयात जागतिक उच्च रक्तदाब जनजागरण दिन साजरा करण्यात आला. ...

Avoid high blood pressure by working in a stress-free environment | तणावमुक्त वातावरणात काम करून रक्तदाब टाळा

तणावमुक्त वातावरणात काम करून रक्तदाब टाळा

Next

गोंदिया : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोगप्रतिबंध कार्यक्रमांतर्गत येथील केटीएस जिल्हा रुग्णालयात जागतिक उच्च रक्तदाब जनजागरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर यांनी, कोरोनाच्या काळात को मोरबीडीटी म्हणजे बीपी, शुगर, किडनी, हार्ट आजार असलेल्या रुग्णांच्या जिवाला जास्त धोका आहे. त्यामुळे नियमित रक्तदाब मोजा व निरोगी राहा. यासाठी तणावमुक्त वातावरणात काम करा, म्हणजे उच्च रक्तदाबाचे शिकार होणार नाही, असे सांगितले.

यावेळी आशा व एएनएम यांना उच्च रक्तदाब रुग्णांचे सर्वेक्षण करून नोंदणी करण्यासाठी कळविण्यात आले. प्रत्येकी ३ व्यक्तींमधून एकामध्ये याची लक्षणे आढळून येतात. चोर पावलांनी येणारा हा आजार जगाच्या आरोग्यासमोरचे आव्हान ठरत आहे. दरवर्षी वेळेच्या आधी मृत्युमुखी पडणाऱ्या ९.४ दशलक्ष लोकांच्या मृत्यूला हाच आजार कारणीभूत ठरत आहे. या व्याधीला दूर ठेवायचे असेल, तर योग्य जीवनशैली आत्मसात करण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. उच्च रक्तदाब हा आजार नाही, पण होणाऱ्या आजाराची चाहूल मात्र नक्की म्हणता येईल. उच्च रक्तदाब ही तक्रार आजच्या धावपळीच्या जीवनशैलीची सामान्य बाब होऊ पाहते आहे.

.....

अशी करा रक्तदाबाची मोजणी

सर्वसाधारणपणे १२० ते १३० ही रक्तदाबाची वरची पातळी सामान्य मानली जाते. तर ८० ते ९० ही खालची पातळी नॉर्मल रक्तदाबामध्ये गणली जाते. रक्तदाब हा व्यक्तीच्या वयानुसार, कामाच्या स्वरूपानुसार आणि काही प्रमाणात आनुवंशिकतेवर अवलंबून असतो. रक्तदाबाची वरची पातळी ही व्यक्तीचे वय अधिक १०० मिळून येणारा आकडा नॉर्मल धरला जातो. उदा. ४५ वय असणाऱ्या व्यक्तीसाठी १४० ते १५० ही वरची पातळी नॉर्मल मानली जाते. अशा वयाच्या व्यक्तीमध्ये १६० या पातळीच्या वर रक्तदाब गेल्यास, तसेच खालची पातळी ९५ पेक्षा अधिक दिसून आल्यास, त्या व्यक्तीस उच्च रक्तदाब असण्याची शक्यता असते, असेही डॉ.हुबेकर यांनी सांगितले.

Web Title: Avoid high blood pressure by working in a stress-free environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.