जबाबदारीतून भाविकांची गैरसोय टाळा
By admin | Published: March 1, 2016 01:15 AM2016-03-01T01:15:21+5:302016-03-01T01:15:21+5:30
प्रतापगड येथील महादेव पहाडीवर महाशिवरात्री यात्रा आणि दर्ग्यावरील उर्सनिमित्त ७ ते १५ मार्च दरम्यान भाविक मोठ्या प्रमाणात येणार आहेत.
प्रतापगड महाशिवरात्री यात्रा : महादेव पहाडी पायऱ्यांचे भूमिपूजन
गोंदिया : प्रतापगड येथील महादेव पहाडीवर महाशिवरात्री यात्रा आणि दर्ग्यावरील उर्सनिमित्त ७ ते १५ मार्च दरम्यान भाविक मोठ्या प्रमाणात येणार आहेत. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी विविध यंत्रणांनी पुढाकार घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील प्रतापगड ग्रामपंचायत परिसरातील सभामंडपात आयोजित सभेत अधिकाऱ्यांना दिले.
महाशिवरात्री यात्रा व ख्वाजा उस्मानगी हारुणी उर्सच्या पूर्वतयारीचा आढावा २७ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री बडोले यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई मेंढे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, दिलीप गावडे, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष रचना गहाणे, पंचायत समतिी सभापती अरविंद शिवणकर, प्रतापगड सरपंच अिहल्या वालदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री म्हणाले, यात्रा व उर्स दरम्यान वैद्यकीय पथक २४ तास कार्यरत राहतील याकडे आरोग्य विभागाने लक्ष द्यावे. विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही याकडे वीज वितरण कंपनीने लक्ष द्यावे व लोंबकाळलेल्या विद्युत तारा व्यविस्थत कराव्या. यात्रेदरम्यान भाविकांना अशुध्द पाणी पुरवठा होणार नाही याची आरोग्य विभागाने काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे पाण्याचे निर्जतुकीकरण करावे. अन्नदान वा महाप्रसाद भाविकांनी घेतल्यानंतर पत्रावळी इतरत्र विखुरल्या जाणार नाही यासाठी कचरा पेट्या तयार कराव्या. मोठ्या संख्येने भाविक चारचाकी व दुचाकी वाहनाने येणार असल्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा खोळंबा होणार यासाठी पाकिंगची व्यवस्था गावच्या संयुक्त वन व्यवस्थापन समतिीने करावी अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.
जिल्हयातील प्रमुख १० तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळांपैकी प्रतापगड हे एक आहे. या स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील असून दरवर्षीपेक्षाही यावर्षी यात्रा चांगल्याप्रकारे व मोठी व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यंवंशी म्हणाले, यात्रेदरम्यान प्लास्टिक पिशव्यांचा वापर होणार नाही याचे निर्देश यात्रेत विविध दुकाने लावणार्या दुकानदारांना देण्यात यावे. खाद्य पदार्थाच्या विविध हॉटेल्समधील पिण्याच्या पाण्यात मेडीक्लोर आरोग्य विभागाने टाकावे. भाविकांसाठी तात्पुरते शौचालय तयार करावे. व्हाईट आर्मीचे ५० स्वयंसेवक यात्रेदरम्यान भाविकांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी तैनात करावे. मंदिर व दर्ग्याच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे लावावे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने पाण्याची टॅकरची व्यवस्था आण िवरच्या पायऱ्यांना बॅरीकेट्स लावावे. कोहमारा-प्रतापगड, अर्जुनी/मोरगाव ते प्रतापगड आण िसाकोली-प्रतापगड अशा जादा बसेसची व्यवस्था राज्य परिवहन मंडळाने भाविकांसाठी करावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. विविध यंत्रणांनी यात्रा व उर्स दरम्यान भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी करण्यात येणार्या कामाची माहिती यावेळी पालकमंत्र्यांना दिली.
तत्पूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रतापगड महादेव पहाडीवरील मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांचे भूमीपूजन करण्यात आले. सदर काम हे स्थानिक विकास निधीतून करण्यात येणार आहे.
पायऱ्यांचे काम पूर्ण झाल्यावर मंदिराकडे दर्शनासाठी ये-जा करणार्या भाविकांना चांगला रस्ता उपलब्ध होणार आहे. प्रतापगड गामपंचायत परिसरात अतिरीक्त केंद्रीय सहायता निधीतून ४ लक्ष रु पये खर्चातून बांधण्यात आलेल्या सभा मंडपाचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
सभेला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नंदनवार, पोलीस उपअधीक्षक(गृह) सुरेश भवर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नारायण निमजे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रभारी प्रकल्प अधिकारी मिनाक्षी उन्हाळे, गोंदिया पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र ढोरे, गोंदिया आगार व्यवस्थापक गौतम शेंडे, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री रामटेके यांचेसह विविध जिल्हास्तरीय व तालुका स्तरीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती होती.
आढावा सभेत यात्रेदरम्यान येणार्या अडचणी व गावातील समस्यांची माहिती ग्रामपंचयात सदस्य व नागरिकांनी यावेळी पालकमंत्र्यांना दिली. प्रास्ताविक गट विकास अधिकारी नारायण जमईवार यांनी केले. आभार विस्तार अधिकारी भावे यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)