रिक्त पदे भरण्यास केली जातेय टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2016 02:27 AM2016-01-08T02:27:37+5:302016-01-08T02:27:37+5:30

गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मुरदाडा ग्रामपंचायतचे पाच सदस्य अपात्र घोषित झाले.

Avoid the vacant posts to be filled | रिक्त पदे भरण्यास केली जातेय टाळाटाळ

रिक्त पदे भरण्यास केली जातेय टाळाटाळ

Next

पाच सदस्य अपात्र : मुरदाडा येथील ग्रामसेवकचा अडेलतट्टूपणा
परसवाडा : गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मुरदाडा ग्रामपंचायतचे पाच सदस्य अपात्र घोषित झाले. तसेच उपसरपंच यांचेही पद गेल्याने ही पदे तीन महिन्यांपासून रिक्त आहे. मात्र रिक्त पदे भरण्यास टाळाटाळ केली जात आहे.
ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ३९ (१) नुसार सदर पद अपात्र झाले. ग्रामपंचायत अधिनियम १९५८-५९ च्या कलम ४३ नुसार ३० दिवसांच्या आत रिक्त भरणे आवश्यक आहे. यासाठी सरपंचाने विशेष सभा बोलावून ग्रामसेवकाकडून नोटीस बजावून कार्यरत सदस्यांमधून पद भरणे आवश्यक आहे. पण सरपंच हे सत्ताधारी पक्षाचे असल्याने पद भरण्यास सभा घेण्यास टाळाटाळ करतात.
यात विरोधी पक्षाचे तीन सदस्य असल्याने विरोधी पक्षाचा उपसरपंच कसा बनवावा, असा सवाल त्यांना पडला असावा.
मात्र उपसरपंचाचे पद भरण्यास टाळाटाळ होत असल्याने ग्राम विकासात अडथळा निर्माण होत आहे. ग्रामसेवक डी.पी. सोनेवाने यांच्या अटलतट्टू धोरणामुळे गावात व तीन महिन्यांपासून मासिक सभा झाल्या नाही.
त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये अशांतता निर्माण झाली आहे. कलम ३७ अन्वये ग्रामपंचायतमध्ये भोंगळ कार्यभार झाल्याने सदर उपसरपंच दयाराम आगासे, सरस्वता लिल्हारे, संगीता चौधरी, वामला शेंडे, उषा धुले अपात्र ठरले.
सदस्य, उपसरपंचाचे रिक्त पद त्वरित भरण्यात यावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य परमानंद उपवंशी, हेमराज बिलेवार, विना गोखे व ग्रामवासी यांनी केली आहे.
सरपंच व ग्रामसेवक यांनी पदाचा दुरूपयोग केल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Avoid the vacant posts to be filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.