बाल महोत्सवात अवतरले शिवराय

By admin | Published: January 4, 2017 01:01 AM2017-01-04T01:01:38+5:302017-01-04T01:01:38+5:30

लोकमत बालविकास मंच व बी.बी. पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.१) नववर्षाच्या पहिल्याच दिवशी

Avtarale Shivrai at Bal Mahotsav | बाल महोत्सवात अवतरले शिवराय

बाल महोत्सवात अवतरले शिवराय

Next

बालकांच्या कलागुणांना वाव : अवनी, अनुश्री व तेजस्विनी एकल नृत्य स्पर्धेत अव्वल
गोंदिया : लोकमत बालविकास मंच व बी.बी. पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.१) नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्हास्तरीय बालमहोत्सवाचे आयोजन केले होते. यात एकल नृत्य, समूह नृत्य व नाटिका या स्पर्धांचा समावेश होता. या महोत्सवात अफजलखानाचा वधाच्या दृष्यासह अनेक नृत्यप्रकारातून विद्यार्थ्यानी कलेची चुणूक दाखविली.
प्रत्येकाच्या अंगी काही ना काही सुप्त गुण असतात, पण त्यांना प्रगट करण्यासाठी प्रोत्साहनाची गरज असते. त्यामुळे अंगी असलेल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याची प्रेरणा मिळते. अशा इच्छेला पूर्णत्वास आणण्याची महत्वाची जबाबदारी लोकमत वृत्तपत्र समुहाने नियमित जपली आहे. लोकमत वृत्तपत्राने समाजातील प्रत्येक घटकाशी जुळता यावे, यासाठी लोकमत बाल विकास मंच, युवा नेक्स्ट व सखी मंच असे महत्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
लोकमत बाल विकास मंचच्या व्यासपीठावरून बालकांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बालक-पालक व शाळांच्या पुढाकाराने बी.बी. पब्लिक स्कूल गोंदिया येथे प्रेक्षकांच्या मोठ्या उपस्थितीत बालमहोत्सव पार पडला.
जिल्हास्तरीय बालमहोत्सव २०१७ ची सुरूवात देवी सरस्वती व लोकमतचे संस्थापक तथा स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या तैलचित्रावर माल्यार्पण व दीप प्रज्ज्वलन करून झाली. यावेळी भंडाऱ्याच्या एम.बी. पटेल कॉलेजचे प्रा. विमल असाटी, बापू युवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. योगेश अग्रवाल, बी.बी. पब्लिक स्कूलचे संचालक भुपेंद्र वैद्य, मुख्याध्यापिका एम.एम. शेख, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने, इव्हेंटचे जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार व जिल्हा संयोजिका दिव्या भगत प्रामुख्याने उपस्थित होते.
स्पर्धेचे निर्णायक म्हणून सम्राट राजेपांडे, संजय शेंडे व धर्मराज काळे उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण स्पर्धांचे निरीक्षण व परीक्षण करून स्पर्धा सादरीकरणावर गुण देवून क्रमांक जाहीर केले.
जिल्ह्यातील शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवून या बालमहोत्सवाला पूर्णत्वास आणले. या विविध स्पर्धा ठेवण्यात आल्या. ज्यात सहभागी स्पर्धकांनी आपापल्या शाळांचे प्रतिनिधित्व करीत क्रमांक मिळविण्याचा प्रयत्न पणास लावले. बाल महोत्सवात नाटिका, एकल नृत्य व समूह नृत्य घेण्यात आले. नाटिका स्पर्धेत जवळपास ६० विद्यार्थी, एकल नृत्यात २५ विद्यार्थी व समूह नृत्यात १०८ विद्यार्थ्यांनी कलाप्रदर्शन करीत महोत्सव यशस्वी केले. विशेष म्हणजे या महोत्सवाला वयाचे सर्वात लहान अवनी चिरवाटकरने एकल नृत्यात दमदार सादरीकरण करीत उपस्थित प्रेक्षकांना आश्चर्यात पाडले व पहिल्या गटात प्रथम क्रमांक पटकाविण्यात तिला यश आले.
प्रास्ताविक व आभार लोकमत इव्हेंटचे जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार यांनी केले. संचालन राम चक्रवर्ती यांनी केले. कार्यक्रमासाठी वरूण खंगार, स्वप्नील पिल्लेवार, दुर्गेश टिकोलिया, संतोष बिलोने, कमलेश भुजाडे आदींनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)

मान्यवरांचे मनोगत
याप्रसंगी विमल असाटी म्हणाले, बालमहोत्सव उपक्रम स्तुत्यप्रिय आहे. शाळांच्या एकत्रितपणामुळे या महोत्सवाला यशप्राप्ती झाली. अंगी कला व गुण असतानाही त्यांना आर्थिक पाठबळ मिळत नसल्याने त्यांची दयनिय अवस्था असते. अशा गरजूंना सामोरे आणण्याचे कार्य जनतेने करावे. या व्यासपीठाला कलागुण सादर करणारी उत्तम उपमा देत अभ्यासासह विद्यार्थ्यांच्या कलागुणांना समोर आणण्यासाठी पालकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले. तर योगेश अग्रवाल म्हणाले, नाटिकेत विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विषयांची उजळणी सर्वांनी करावे. या बालमहोत्वात बालमेळावाच पहायला मिळाला. यशाचे शिखर गाठण्याचे धडेही या वेळी त्यांनी दिले. बी.बी. पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका एम.एम. शेख यांनी, विद्यार्थ्यांमध्ये काही जन्मजात नैसर्गिक कलागुण असतात त्यांना पुढे आणणे व तर काही विद्यार्थी प्रयत्न व परिश्रमातून कलागुण आत्मसात करतात, अशा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मंच उपलब्ध करून देण्याचे कार्य लोकमतच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे लोकमतचे कार्य निश्चितच प्रसंशनिय आहे, असे म्हटले.

 

Web Title: Avtarale Shivrai at Bal Mahotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.