मलेरिया आणि डेंग्यू प्रतिबंधासाठी जनजागृती ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:33 AM2021-09-05T04:33:13+5:302021-09-05T04:33:13+5:30

गोंदिया : शहरात डेंग्यू मलेरियाचा वाढता प्रकोप पाहता, नागरिकांना माहिती देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत ...

Awareness for Malaria and Dengue Prevention () | मलेरिया आणि डेंग्यू प्रतिबंधासाठी जनजागृती ()

मलेरिया आणि डेंग्यू प्रतिबंधासाठी जनजागृती ()

Next

गोंदिया : शहरात डेंग्यू मलेरियाचा वाढता प्रकोप पाहता, नागरिकांना माहिती देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वॉर्ड परिसरात घरोघरी जाऊन जनजागृती केली. विद्यार्थ्यांनी प्रभाग परिसराच्या स्वच्छतेबाबत नगरसेवक प्रतिनिधींची भेट घेतली.

शहरातील छोटा गोंदियामध्ये मागील दीड महिन्यापासून डेंग्यू, मलेरियाचा प्रकोप वाढला आहे. प्रत्येक घरात सर्दी, तापाचे रुग्ण वाढत आहेत. छोटा गोंदिया परिसरात चार मुलांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याचे या वॉर्डातील नागरिकांनी सांगितले. या आजाराच्या अनेक रुग्णांना नागपुरात उपचार घ्यावे लागत आहेत. कोरोना महामारीनंतर विषाणूजन्य तापाने नागरिकांना ग्रासले होते, आता या वाढत्या गंभीर समस्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिगंबर कापसे, छायांकी भेलावे, लक्ष्मी मंडिये, जिज्ञासा शर्मा, मोहना राठोड, वैभव कोरे, अंजली शर्मा, अबोली बोरकर, अंजली मुरकुटे, अतुल चौहान, अंकुश बिशेन, खुशाली चौरीवार, कौशल लिल्हारे, करिश्मा भगत, ललिता लिल्हारे, जयश्री शेंद्रे, हिमांशू गोडसे, पलाश येरपुडे, ममता तुरकर, नेहा भोंडेकर, मोनाली पटले, पायल बोपचे, पायल रहांगडाले, प्राची चौधरी, प्रेरणा नागपुरे, प्रियंका नागरीकर, प्रगती खरे, सुभांशू कटरे, ट्विंकल बिसेन, शीतल गणवीर, रितू शरणागत, योगांक्षी राघोर्ते, स्नेहा चौबे, शिया मुंडेले, सीमा पटले, जान्हवी सोनवाणे, श्रद्धा रामटेके, पुष्पराज गौतम, कुलदीप वैद्य, विक्रांत मुंडेले जनजागृती करीत आहेत.

...........

या करा उपाययोजना

घराच्या परिसरात स्वच्छता ठेवा, मलेरिया आणि डेंग्यूची लागण डासांमुळे होते. त्यामुळे आसपास पाणी साचले असेल तर पाणी काढून टाका किंवा खड्डे भरून काढा. खड्ड्यांमध्ये भरलेले पाणी काढता येत नाही. नंतर त्यात जळलेले ऑइल घाला. जेणेकरून त्यात डासांची पैदास होऊ शकणार नाही. घरात डास टाळण्यासाठी, कडुनिंबाची पाने जाळा किंवा बाजारात उपलब्ध डास प्रतिबंधक अगरबत्ती, औषध वापरा. यासह मच्छरदाणीचा उपयोग करावा.

Web Title: Awareness for Malaria and Dengue Prevention ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.