कोविड लसीकरणासाठी रॅली काढून जनजागृती ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:33 AM2021-05-25T04:33:14+5:302021-05-25T04:33:14+5:30
केंद्र सरकारने १६ जानेवारीपासून देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. कृतिदल तसेच वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ४५ वर्षे वयावरील सर्व ...
केंद्र सरकारने १६ जानेवारीपासून देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. कृतिदल तसेच वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ४५ वर्षे वयावरील सर्व व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याचे ठरविले आहे. सर्वांनी या लसीचा फायदा घ्या असे आवाहन गृहभेट घेऊन शिक्षकांनी केले. तसेच वारंवार हात धुणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे व शारीरिक अंतर ठेवणे इत्यादी बाबत माहिती देण्यात आली तसेच लसीकरण जागृतीपर पोस्टर लावण्यात आले. यासाठी लय, ताल व कृतीचे माध्यमाने लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
रॅलीसाठी केंद्रप्रमुख विलास डोंगरे, मुख्याध्यापक पटले, मुख्याध्यापक बघेले, व्ही.व्ही. मेश्राम, डी.आर.गीरीपुंजे, व्ही. आर.खोब्रागडे, जि.एन.बिसेन, आर.के किरसान, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. दिनेश मोटघरे, डाॅ. रुबी रीनाईत, ढमके, आरोग्य सेविका मेश्राम, लांडगे, बन्सोड, कोरोना तपासक बिसेन, औषध वितरक तुमसरे, आशा गट परिवर्तक रेखा पटले, दीपा टेंभरे, आशा वर्कर अनिता बघेले, कांता भेलावे, हंसकला भेलावे, अश्विनी मेश्राम यांनी सहकार्य केले.